शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नाशिक मनपा आयुक्तपदी तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:30 IST

नाशिक : बारा वर्षांच्या सेवाकाळात दहा बदल्यांचा अनुभव गाठीशी असलेले आणि आपल्या धडाकेबाज कामगिरीने परिचित असलेले तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, तुकाराम मुंढे शुक्रवारी (दि.९) महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

ठळक मुद्देअभिषेक कृष्ण यांची बदलीउद्या स्वीकारणार पदभार

नाशिक : बारा वर्षांच्या सेवाकाळात दहा बदल्यांचा अनुभव गाठीशी असलेले आणि आपल्या धडाकेबाज कामगिरीने परिचित असलेले तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, तुकाराम मुंढे शुक्रवारी (दि.९) महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या बदलीची चर्चा गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू होती. अखेर, बुधवारी (दि.७) दुपारी कृष्ण यांच्या बदलीचे आदेश निघाले. कृष्ण यांच्या जागेवर सध्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मूळचे बीड जिल्ह्णातील असलेले तुकाराम मुंढे यांनी सोलापूर, जालना याठिकाणी जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त तसेच विक्री व कर विभागाचे सहआयुक्त म्हणून काम पाहिले आहे. सन २००९ मध्ये त्यांनी नाशिकला आदिवासी आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्त म्हणूनही कार्यभार सांभाळलेला आहे. गेल्या १२ वर्षांत तुकाराम मुंढे यांची दहा वेळा बदली झालेली आहे. नवी मुंबई, सोलापूर येथील त्यांची कारकीर्द गाजलेली आहे. शुक्रवारी (दि.९) तुकाराम मुंढे पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची बदली मुंबई एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे. अभिषेक कृष्ण यांनी दि. ८ जुलै २०१६ रोजी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. आपल्या १९ महिन्यांच्या कारकिर्दीत अभिषेक कृष्ण यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यात प्रामुख्याने, गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेला भंगार बाजार अतिक्रमणचा प्रश्न निकाली काढला. याशिवाय, खतप्रकल्प, वेस्ट टू एनर्जी, उद्यानांची देखभाल-दुरुस्ती, नगररचना विभागात आॅटो डीसीआर प्रणाली, झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण, अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी, घंटागाडी या प्रश्नांना हात घालत गुंता सोडविला. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे ४१ कोटींनी वाढ झाली.सानप यांनी घेतली भेटआयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या बदलीचे वृत्त समजताच आमदार बाळासाहेब सानप यांनी महापालिका मुख्यालयात येत कृष्ण यांची भेट घेऊन चर्चा केली. कृष्ण यांची बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बाहेर भाजपाचे नगरसेवक देत होते. परंतु, कृष्ण यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले होते. याशिवाय, पालकमंत्र्यांनीही कृष्ण यांचेशी चर्चा केल्याचे समजते. परंतु, थेट मुख्यमंत्र्यांकडूनच मुंढे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा असल्याने सत्ताधारी भाजपासह विरोधकांनीही प्रतिक्रिया नोंदविताना सावध पवित्रा घेतला आहे. दरम्यान, अभिषेक कृष्ण यांनी आपण गुरुवारी पदभार सोडणार असल्याचे सांगत अधिक भाष्य टाळले तर महापालिकेतील सत्ताधाºयांसह विरोधी पक्षातील पदाधिकाºयांनाही त्यांनी भेट देणे टाळले.अधिकारी, नगरसेवकांमध्ये धास्तीमहापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याची वार्ता पसरताच महापालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांसह नगरसेवकही धास्तावले. मुंढे यांची आजवरची कारकीर्द पाहता नाशिक महापालिकेतही तोच अध्याय पुढे चालू राहणार असल्याने सत्ताधारी भाजपातही चिंतेची लहर पसरली आहे. विरोधी पक्षाने तर सावध भूमिका घेत त्यावर भाष्य करणे टाळले आहे.