शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 18:21 IST

सायखेझ : शिंगवे (ता.निफाड) येथील युवा शेतकरी भाऊलाल रामभाऊ ङेर्ले ऊसाला पाणी लावण्यासाठी घाई घाईने शिंगवे शिवारातील आपल्या शेताकडे निघाले. रस्त्याने जात असतांना अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतातून बिबट्याचे आगमन झाले. सोबत दोन बछङेही होते. बिबट्याला पाहताच त्यांनी गाडी जागेवर थांबली.

ठळक मुद्देबछड्यासह ठाण मांडून रस्त्यावर बसला अर्धा तास

सायखेझ : शिंगवे (ता.निफाड) येथील युवा शेतकरी भाऊलाल रामभाऊ ङेर्ले ऊसाला पाणी लावण्यासाठी घाई घाईने शिंगवे शिवारातील आपल्या शेताकडे निघाले. रस्त्याने जात असतांना अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतातून बिबट्याचे आगमन झाले. सोबत दोन बछङेही होते. बिबट्याला पाहताच त्यांनी गाडी जागेवर थांबली.हातपाय थरथर कापायला लागले.बिबट्याची मादी आपल्या बछङ्यांसह आरामात रस्त्यावर विसावली. भाऊलाल यांना हालताही येईना. काही वेळातच ती भाऊलाल यांच्यावर गुरगूरायला लागला. बिबट्या काही धेळाने उठला आणि एक मोठी ङरकाळी फोडली आणि भाऊलाल यांच्याकडे यायला लागली. बछडे मात्र जागेवर बसून होते.भाऊलाल यांनी समयसुचकता साधत सोबत असणारे फावङे मादीच्याच्या दिशेने उगारले आणि आरडा-ओरड केला. त्यामुळे बिबट्या थबकला. आणि काही वेळानंतर बछड्यांना सोबत घेत पुन्हा ऊस शेतात परत मार्गस्थ झाला. अर्धा तास समोर मृत्यूला सामोरे गेलेले भाऊलाल घाबरुन गेल्या पावली परतले. त्यानंतर तातङीने वन परिक्षेत्रपाल संजय भंडारी यांना घटनेची माहीती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पहाणी करुन लगेचच पिंजरा लावला. पण पिंजºयात सावजच ठेवले नाही. केवळ शेतकºयांना बोकड आणण्याचे फर्मान सोडून वनविभागाचे कर्मचारी निघून गेले. मग शेतकरीही बोकडाच्या शोधात रमले मात्र अजूनही त्या पिंजºयात ठेवण्यासाठी सावज सापडलेले नाही. कारण बोकड्यासाठी पाच हजार रूपये देणार कोण ? या प्रश्नात पिंजरा मात्र तसाच ठेवण्यात आला. आता वनविभाग मोकळ्या पिंजºयात बिबट्याची जेरबंद होण्याची आस लावून बसलयं..... आणि बिबट्याच्या दहशतीने शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाही.शिंगवे शिवारात बिबट्यांची दहशत कायम असतांना वनविभाग फक्त पिंजरा लावून मोकळे होतात. त्याच्यात सावज ठेवण्यासाठी स्थानिकांना सांगितले जाते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाय योजना करावी अशी शेतकरी मागणी करीत आहेत.भाऊलाल ङेर्ले, शेतकरी शिंगवे, ता.निफाड.