संगमेश्वर : महाराष्ट्र राज्य माळी महासंघाची मालेगाव शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक माळी मंगल कार्यालय संगमेश्वर येथे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब तिडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.प्रारंभी ज्येष्ठ कार्यकर्ते संजय माळी यांनी प्रास्ताविक केले. राजकीय पक्षविरहित महाराष्ट्र माळी महासंघाची मालेगाव शहर व तालुक्यात स्थापना करण्यात आली आहे. बैठकीस राज्य संघटक आर. बी. माळी, पोपटराव जगझाप, मालेगाव माळी पंच कमिटीचे अध्यक्ष प्रकाश सावकार, नगरसेवक सखाराम घोडके, धर्मा भामरे आदि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.माजी नगरसेवक राजाराम जाधव, म. फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, यशपाल बागुल, बाळासाहेब बागुल, जाधव गुरुजी आदिंनी यावेळी मार्गदर्शन केले. बैठकीस विश्वास माळी, अॅड. एम. जी. गिते, रमेश मोरे, पं. स. सदस्य मानकर, नगरसेवक नरेंद्र सोनवणे, अशोक फराटे, अॅड. कालिदास तिसगे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. संजय माळी यांनी आभार मानले. (वार्ताहर )
पोटजातींना एकत्र करण्याचा प्रयत्न
By admin | Updated: October 4, 2015 23:44 IST