शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यात माकपचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 18:14 IST

सुरगाणा : अज्ञात समाजकंटकांनी येथील माकपाच्या कार्यालयाला मध्यरात्रीस आग लावण्याच्या केलेल्या प्रयत्नात कार्यालयातील झेरॉक्सच्या दुकानास आग लागून सर्व साहित्य भस्मसात होऊन मोठे आर्थिक नुकसान केले आहे. मटक्यासह सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी केल्यानेच हा प्रकार घडवून आणला असल्याचे माकपने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ठळक मुद्दे माकप : अवैध धंदे बंद करण्याची मागणी केल्यानेच आग लावली

सुरगाणा : अज्ञात समाजकंटकांनी येथील माकपाच्या कार्यालयाला मध्यरात्रीस आग लावण्याच्या केलेल्या प्रयत्नात कार्यालयातील झेरॉक्सच्या दुकानास आग लागून सर्व साहित्य भस्मसात होऊन मोठे आर्थिक नुकसान केले आहे. मटक्यासह सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी केल्यानेच हा प्रकार घडवून आणला असल्याचे माकपने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.येथील पोलिस ठाण्यापासून जेमतेम शंभर पावलांवर माकपाचे तालुका कार्यालय असून याच कार्यालयात बाहेरील बाजूने माणीचे सरपंच योगेश जाधव (रा.हनुमंतमाळ) यांचे झेरॉक्सचे दुकान आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आग लावून माकपचे कार्यालय जाळण्याचा कट करून त्यात पक्ष कार्यालयाच्या बाहेरील झेरॉक्स दुकान जळून खाक झाले आहे. पक्षाच्या कार्यालयात आगीच्या ज्वाळा पोहचल्याने कागदपत्रांचे नुकसान झाले आहे. शहरासह तालुक्यात असे प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत. मात्र त्या घटनांमधील जाळपोळ करणारे संशयित अद्यापही पोलिसांना सापडले नाहीत. शहरासह तालुक्यात मटका व ईतर अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादानेच सुरू आहेत. हे सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीचे निवेदन पक्षाच्याच तरूणांनी तीन चार दिवसांपूर्वी पोलिसांना दिले होते. त्याचाच राग धरून अवैध धंदे करणाऱ्यांनी आमच्या पक्ष कार्यालयास आग लावली आहे. सुरगाणा व बार्हे पोलिस ठाण्याच्या पोलिसांना अवैध धंदे करणारे व त्यानंतर त्या धंद्याबद्दल तक्र ार केल्यामुळे तक्र ारदारांच्या वाहनांना आग लावणारे समाजकंटक माहित आहेत. त्यामुळे आम्ही पोलिसांना याप्रकरणात सामिल असलेल्या समाजकंटकांना येत्या सात फेब्रुवारी पर्यंत अटक करून ठोस कारवाईची मागणी माकपचे आमदार जे.पी. गावित यांचेसह पक्षाचे पदाधिकारी सुभाष चौधरी, रामजी गावित, योगेश जाधव, सुरेश गवळी, उत्तम कडू, सोमा शेवरे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे. झेरॉक्स दूकान चालक व माकपचे सरपंच योगेश जाधव यांनीही जाळपोळ करणार्या अज्ञातांविरोधात फिर्याद दिली आहे.