शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांना विश्वस्तांकडूनच "खो"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 23:10 IST

नाशिक : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नवरात्रोत्सवात सप्तश्रृंगी गडावर देवी मंदिरात दर्शनासाठी १० वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश देण्यास मनाई केलेली असतानाही विश्वस्तांकडूनच जिल्हाधिकाऱ्यांचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे मंगळवारपाठोपाठ बुधवारी(दि.१३) देखील एका विश्वस्ताने आपल्या दहा वर्षांच्या आतील मुलाला दर्शनासाठी सोबत नेल्याने नियम केवळ सामान्य भाविकांनाच लागू आहेत काय, असा संतप्त सवाल आता भाविकांकडून केला जात आहे. लागोपाठच्या या नियम उल्लंघनामुळे जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करतात, याकडे भाविकांचे लक्ष लागून असून, विश्वस्तांनी मात्र याबाबत चुप्पी साधली आहे.

ठळक मुद्देगाभाऱ्यात मुलांना प्रवेश : लागोपाठ घटना, कारवाईकडे लक्ष

नाशिक : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नवरात्रोत्सवात सप्तश्रृंगी गडावर देवी मंदिरात दर्शनासाठी १० वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश देण्यास मनाई केलेली असतानाही विश्वस्तांकडूनच जिल्हाधिकाऱ्यांचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे मंगळवारपाठोपाठ बुधवारी(दि.१३) देखील एका विश्वस्ताने आपल्या दहा वर्षांच्या आतील मुलाला दर्शनासाठी सोबत नेल्याने नियम केवळ सामान्य भाविकांनाच लागू आहेत काय, असा संतप्त सवाल आता भाविकांकडून केला जात आहे. लागोपाठच्या या नियम उल्लंघनामुळे जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करतात, याकडे भाविकांचे लक्ष लागून असून, विश्वस्तांनी मात्र याबाबत चुप्पी साधली आहे.गेल्या ७ ऑक्टोबरपासून मंदिरे सुरू झाल्याने भक्तांना दर्शनाची आस लागली असताना शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्याजिल्हाधिकाऱ्यानी भक्तांना जाचक अटी लावून भगवतीच्या दर्शनापासून वंचित ठेवल्याने अनेकांना नांदुरीला पहिल्या पायरीवर माथा टेकून ऑनलाइनमुळे माघारी फिरावे लागले. मात्र, या जाचक अटी सप्तश्रृंगी निवासनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला लागू नाहीत का ? असा सवाल भक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे. १० वर्षांच्या आतील बालकांना परवानगी नसताना भगवतीच्या महापूजेला विश्वस्ताच्या मुलांना प्रवेश कसा ? असा सवाल ट्रस्ट अध्यक्ष व व्यवस्थापन यांना भक्तांनी केला आहे.सातव्या व आठव्या माळेला भगवतीच्या महापूजेचा मान दोन्ही विश्वस्तांना होता. या दोन्ही महापूजेला लहान मुलांची उपस्थिती भक्तांच्या निदर्शनास आली. बुधवारीदेखील आठव्या माळेच्या महापूजेला विश्वस्त यांच्या १० वर्षांच्या आतील मुलाच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाविकांनी कर्मचाऱ्यांकडे याबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी चुप्पी साधली."त्या"  विश्वस्तांना पदमुक्त करा!सप्तश्रृंगी गडावर गेल्या सात दिवसांपासून शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करून नवरात्रोत्सव सुरू आहे. ६५ वर्षांवरील वयोवृद्धांना व १० वर्षांच्या आतील बालकांना दर्शनासाठी बंदी केल्यामुळे भक्तांमध्ये नाराजीचा सूर असताना ऑनलाइन दर्शन सुविधा सुरू केल्याने नाराजीत आणखीनच भर पडली. पहिल्या दोन तीन दिवशी भक्तांनी ऑनलाइनकडे पाठ फिरवल्यामुळे नाराजी दिसून आली होती. त्यात विश्वस्तांच्या मुलांना प्रवेश आणि भक्तांच्या मुलांना प्रवेश बंदी या नियमामुळे प्रशासन यंत्रणेवर नाराजी वाढली असून, विश्वस्तच जर शासनाचे नियम पायदळी तुडवत असतील तर या विश्वस्तांना या संस्थेवरून पदमुक्त करा आणि शासननियुक्त विश्वस्त मंडळ नियुक्त करा, असा सूर भक्तांनी लावला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीNashikनाशिक