शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

मालेगाव तहसील आवारातून  पळवून नेलेल्या ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:08 IST

मालेगाव तहसील आवारातून सोमवारी मध्यरात्री वाळूमाफियांनी पळवून नेलेल्या दहापैकी सहा ट्रक मनमाड व चोंढी शिवारातून छावणी पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी शुक्रवारी दोघा संशयित आरोपींना अटक केल्याने आरोपींची संख्या आता सहा झाली आहे, तर चार फरार संशयित आरोपींचा पोलीस पथक शोध घेत आहेत.

मालेगाव : मालेगाव तहसील आवारातून सोमवारी मध्यरात्री वाळूमाफियांनी पळवून नेलेल्या दहापैकी सहा ट्रक मनमाड व चोंढी शिवारातून छावणी पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी शुक्रवारी दोघा संशयित आरोपींना अटक केल्याने आरोपींची संख्या आता सहा झाली आहे, तर चार फरार संशयित आरोपींचा पोलीस पथक शोध घेत आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या वाळूच्या रिकाम्या ट्रक कॅम्प पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या करण्यात आल्या आहेत.  अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत व देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार यांनी विनापरवानगी व बनावट पावत्यांच्या आधारे वाळू वाहतूक करणाऱ्या दहा ट्रक पकडल्या होत्या. सोमवारी मध्यरात्री वाळूमाफियांनी दंड न भरताच तहसील आवारातून ट्रक पळवून नेल्या होत्या. या प्रकरणी येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक इंद्रजित विश्वकर्मा, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, राहुल कोलते, नवनाथ कदम, शांतिलाल जगताप, अविनाश राठोड, मधुकर गांगुर्डे, पंकज भोये, अजय पगारे आदींच्या पथकाने पळवून नेलेल्या ट्रकचा शोध घेतला. दहापैकी सहा ट्रक मनमाड व चोंढी येथून शुक्रवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच समाधान चौधरी व ज्ञानेश्वर केसनोर या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान फरार असलेल्या संतोष बबन सांगळे रा. तामसवाडी, ता. निफाड, दत्तात्रेय निवृत्ती केसनोर रा. सातगाव धुळे, बळवंत संतोष पाटील, शिवाजी पांडुरंग पाटील दोघे रा. दह्याणे, ता.जि. धुळे या चौघा संशयितांचा शोध घेण्यास पोलीस पथक रवाना झाले आहेत. जळगाव जिल्हाधिकाºयांकडे टीपी व बनावट पावत्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाºयांनी पावत्या बोगस असल्याचा अहवाल दिला तर संशयित आरोपींच्या कलमांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.जप्त केलेल्या ट्रकचे क्रमांकछावणी पोलिसांनी मनमाड व चोंढी शिवारातून जप्त केलेल्या ट्रकचे क्रमांक पुढीलप्रमाणे : एमएच १८ एए ७२५९, एमएच १८ एए ८३५१, एमएच १८ बीए ७७२५, एमएच १८ एसी ८६८७, एमएच ४२ टी ०६८४,  एमएच ४१ एजी ०९५७

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय