शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

सारदे रस्त्यावर  दोन विद्यार्थिनींना ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:55 IST

सारदे रस्त्यावर शेणखताने भरलेल्या ट्रकने दोन मुलींना चिरडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. एका मुलीवर मालेगाव येथे तर दुसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याने नाशिक येथे उपचार सुरू आहेत. वायगावजवळ झालेल्या भीषण अपघातामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते.

सटाणा : सारदे रस्त्यावर शेणखताने भरलेल्या ट्रकने दोन मुलींना चिरडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. एका मुलीवर मालेगाव येथे तर दुसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याने नाशिक येथे उपचार सुरू आहेत. वायगावजवळ झालेल्या भीषण अपघातामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते.वायगाव येथील कल्याणी सीताराम कापडणीस (१६)  व भाग्यश्री नीलेश बोरसे (१६) या दोघी मैत्रिणींनी नुकतीचदहावीची परीक्षा दिली आहे. सुटीच्या  दिवसात त्यांनी नामपूर येथे संगणक क्लास लावला. नेहमीप्रमाणे कल्याणी व भाग्यश्री बाळू शेवाळे यांच्या शेताजवळील वायगाव-सारदे रस्त्यावर शुक्रवारी (दि.११) सकाळी नामपूरला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाखाली बसल्या होत्या. काही वेळातच रस्त्याची परिस्थिती न बघता नामपूरहून शेणखत भरलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली.  दोघीही चाकाखाली सापडल्या. यात कल्याणी कापडणीस हिचे दोन्ही पाय कायमस्वरूपी निकामी झालेत तर भाग्यश्रीचा एक पाय निकामी झाला. तसेच अंगावर काही ठिकाणी जखमा झाल्या आहेत.  अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही मुलींना चिरडून ट्रक थेट झाडावर आदळला, यामुळे ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आजूबाजूला राहणारे शेतकरी व गावातील ग्रामस्थांनी धाव घेत मुलींना तातडीने रुग्णालयात हलविले; मात्र कल्याणीची प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.  भरधाव ट्रक चालविणारा ट्रकचालक फैजानखान करीमखान पठाण (रा. जायखेडा, ता. बागलाण) याला पोलिसांनी अटक केली आहे. जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामस्थ संतप्तसंतप्त ग्रामस्थांनी पोलिसांना जागेवरून ट्रक हलवू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे व जायखेडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी घटनास्थळी भेट दिली व नागरिकांची समजूत घातली. यावेळी काही विपरीत घटना घडू नये यासाठी दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते.

टॅग्स :Accidentअपघात