टाकळीरोड : प्रभाग क्र. ३० मध्ये सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या संथ कामामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.येथील टाकळी फाट्याकडे जाणार्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मनपाने ठेकेदारास दिले आहे. त्यामुळे एका बाजूला रुंदीकरण सुरू असताना नेहमी प्रवास करणार्या रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. कोतवाल नर्सिंग होम जवळच रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा खणलेला आहे. त्यामुळे दुचाकी या खड्ड्यात उडकून वाहनचालक पडण्याच्या घटना गेल्या ३ ते ४ दिवसांपासून घडत आहेत. एक युवक ३० च्या वेगाने गाडी चालवत आला; मात्र अंदाज न आल्याने तो या खड्ड्यात पडला. यात त्याला जबर मार बसला. आता याची तक्रार कोणाकडे करावी, हा प्रश्न त्याला त्यावेळी पडला होता.
रस्ता रुंदीकरणाच्या संथ कामाचा होतोय त्रास
By admin | Updated: May 17, 2014 00:39 IST