शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉक विथ कमिशनर’  शीर्षक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:15 IST

महाराष्ट शासनाच्या मराठी भाषा विभागाने शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर सक्तीचा करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाचे इंग्रजी शीर्षक अडचणीत सापडले आहे.

नाशिक : महाराष्ट शासनाच्या मराठी भाषा विभागाने शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर सक्तीचा करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाचे इंग्रजी शीर्षक अडचणीत सापडले आहे. मायमराठीचा जागर करणाऱ्या मनसेनेही या शीर्षकाबाबत हरकत घेत शासनाचा अधिकारी म्हणून आयुक्तांकडून या उपक्रमाचे मराठीकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे आयुक्तांकडून शासन निर्णयाची अंमलबजावणी होईल काय, याकडे आता लक्ष लागून असणार आहे.  विषय तसा किरकोळ, परंतु तो थेट मराठी माणसाच्या अस्मितेशी जोडला गेलेला असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाचे शीर्षक त्यामुळे चर्चेत आले आहे. तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईत आयुक्त असताना ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याठिकाणी सुमारे ३० हून अधिक उपक्रमांत तीन हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नवी मुंबईच्याच धर्तीवर मुंढे यांनी नाशिकमध्येही गेल्या तीन आठवड्यांपासून दर शनिवारी शहरातील जॉगिंग ट्रॅकवर ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम सुरू केलेला आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित पहिल्याच उपक्रमाप्रसंगी आयुक्तांच्या मातोश्रींची प्रकृती बिघडल्याने केवळ तक्रारी स्वीकारण्यात आल्या होत्या. त्यावेळी आयुक्तांनी काही मिनिटे हजेरी लावत इंग्रजीतूनच आपली अडचण विशद केली होती. त्यामुळे या उपक्रमाचे नेमके स्वरूप नागरिकांच्या लक्षात येऊ शकले नव्हते. दुसºयांदा पुन्हा त्याच मैदानावर आयोजित उपक्रमात मात्र स्वरूप समोर आले आणि ‘वॉक विथ कमिशनर’ नव्हे तर ‘टॉक विथ कमिशनर’ असे दर्शन घडले. दरम्यान, राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने आता शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर अनिवार्य करतानाच वरिष्ठ अधिकाºयांना कोणत्याही जाहीर कार्यक्रमात बोलताना मराठीचाच वापर बंधनकारक केलेला आहे. अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता आयुक्तांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या इंग्रजी शीर्षकालाच धक्का पोहोचणार असल्याचे चर्चिले जात आहे.शासनाचा निर्णय होण्यापूर्वीच मनसेने ‘वॉक विथ कमिशनर’ हे शीर्षक मराठीतून करण्याची मागणी केलेली होती. आता शासनानेच मराठी भाषेचा वापर अनिवार्य केल्याने आयुक्तांकडून त्याची निश्चितच नोंद घेतली जाऊन शीर्षकात बदल केला गेला पाहिजे. याशिवाय महापालिकेच्या व्यवहारातही त्याचा परिणामकारक वापर दिसून येईल, ही अपेक्षा आहे.  - संदीप भवर, अध्यक्ष, मनसे मनपा कर्मचारी युनियन

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका