शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेमुळे पोलीस क्रेडिट सोसायटीत अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 19:41 IST

नोटाबंदीनंतर अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीची कोट्यवधी रुपये रक्कम अडकल्याने सध्या पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटी आर्थिक अडचणीत सापडली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीला रक्कम परत करावी या मागणीसाठी पोलीस सोसायटीच्या

ठळक मुद्दे१६ कोटी अडकले : सभासदांना कर्जपुरवठा थांबला

नाशिक : नाशिक जिल्हा पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवलेली तसेच रिझर्व बँकेच्या नियमानुसार रिझर्व फंड म्हणून जमा केलेली व बचत खात्यातील रक्कम अशी अंदाजे सुमारे १६ कोटी रुपयांची रक्कम जिल्हा बँकेत अडकल्याने गेल्या काही महिन्यांपासून पोलीस कर्मचारी असलेल्या सभासदांना कर्जपुरवठा करण्यात सोसायटीला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नोटाबंदीनंतर अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीची कोट्यवधी रुपये रक्कम अडकल्याने सध्या पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटी आर्थिक अडचणीत सापडली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीला रक्कम परत करावी या मागणीसाठी पोलीस सोसायटीच्या चेअरमनने पुढाकार घेत वारंवार जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची भेट घेत रक्कम देण्याची मागणी केली, मात्र त्यांच्याकडूनदेखील टाळाटाळ केली जात असल्याने पोलीस सोसायटी चेअरमनच आता जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारावर उपोषणाच्या तयारीत आहे.तत्कालीन संचालक मंडळाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत काही वर्षांपूर्वी मुदत ठेव रक्कम ठेवली होती सदर मुदत ठेव रक्कम व व्याज अशी जवळपास ११ कोटी रुपयांची रक्कम आहे, तर रिझर्व बँकेच्या नियमानुसार रिझर्व फंड म्हणून सुमारे ५ ते ६ कोटी रुपये जमा आहेत. बचत खात्यात ६५ लाख रुपये रक्कम असून, जिल्हा बँकेत एकूणच पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीची अंदाजे १६ कोटी रुपयांची रक्कम सद्यस्थितीत अडकून आहे. जिल्हा बँकेत रक्कम अडकल्याने सभासद असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मागणीनुसार कर्जपुरवठा करणे पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीला शक्य होत नाही त्यामुळे सध्या कर्जवाटप केलेल्या वसुली रकमेतून पुन्हा नवीन कर्जवाटप चालू आहे. दर महिन्याला किमान ४ ते ५ कोटी रुपये सभासद कर्ज मागणी करत आहे. कर्जवाटप वसुलीतून महिन्याकाठी केवळ दोन कोटीपर्यंत वसुली होत असल्याने सभासदांना मागणीनुसार कर्जपुरवठा केला जात नाही.मुला-मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, पावसाळ्यापूर्वी घर दुरुस्ती, गृहकर्ज, घर खरेदी, अपघात, दवाखाना यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून कर्ज मागणी केली जात आहे. मात्र जिल्हा बँकेत मुदत ठेवीसह अन्य रक्कम अडकून असल्याने सर्वच सभासदांना मागणीनुसार कर्ज मिळत नसल्याने सभासदांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस कर्मचाºयांना बँका तसेच इतर वित्तीय संस्था कर्जपुरवठा करत नाही. त्यामुळे पैशांची गरज पडल्यास नाशिक पोलीस क्रेडिट सोसायटी खूप मोठा आधार आहे, मात्र पोलीस सोसायटी रक्कम जिल्हा बँकेत अडकली असल्याने पोलिसांची स्वत:च्या पैशासाठी अवहेलना होत असल्याने समाजासाठी, शासनासाठी शरमेची बाब असून पोलीस कर्मचाºयांना न्याय कोण देणार, असा सवाल पोलीस सभासदांनी केला आहे.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक