शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

विजयादशमी उत्साहात

By admin | Updated: October 13, 2016 00:57 IST

रावणदहन : बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी; मोठी आर्थिक उलाढाल

सिन्नर : शहर व तालुक्यात विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. सराफ बाजार, वाहन खरेदी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. सिन्नर तालुक्यावर पाच वर्षांपासून दुष्काळाचे सावट होते. यावर्षी मात्र तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने सर्वांमध्ये उत्साह दिसून आला. प्लॉट, फ्लॅट आणि घर खरेदी करण्यासाठीही काही प्रमाणात उत्साह दिसून आला. सकाळी शहरात सरस्वती पूल, भैरवनाथ मंदिर व वावी वेस भागात नागरिकांनी फुले व आपट्याची पाने खरेदीसाठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातही फुले विक्रीसाठी चौकाचौकांत विक्रेते दिसून येत होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्रेत्यांकडून विविध योजना दिल्या जात होत्या. त्यामुळे ग्राहकांनी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर विविध वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी सीमोल्लंघन करून आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देत शुभेच्छा देण्यात आल्या. दुष्काळामुळे यावर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पादन कमी असल्याने भाव कडाडले होते. वाहनांना सजवून झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. शहराच्या पश्चिमेला असलेल्या गावाबाहेरील देवीच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कुंदेवाडीत रावणदहनतालुक्यातील कुंदेवाडी येथे शिवस्वराज्य फाउंडेशनच्या वतीने विजयदशमीनिमित्ताने सुमारे २५ फूट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. कुंदेवाडी येथील ग्रामदैवत जगदंबामातेची आरती व पूजन झाल्यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ व खोपडीचे सरपंच गणेश गुरुळे यांच्या हस्ते या रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. रंगीबेरंगी शोभेची दारू, फटाके यांच्या मनोहारी प्रकाशपर्वात अहंकारी प्रवृत्तीचे दहन करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक सुरेश कुऱ्हाडे, भाऊसाहेब नाठे, हरिभाऊ माळी, ग्रामपंचायत सदस्य रतन नाठे, रवि माळी, बाळासाहेब नाठे, हेमंत माळी, संदीप नाठे, पांडुरंग गोळेसर, अनिल माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून दहातोंडी दहशतवादी रावणाचे दहन करण्यात आले. भास्कर नाठे यांच्या नेतृत्वाखाली ४० मीटरचे कापड वापरून २५ फुटी रावणाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. यावेळी प्रकाश माळी, पोपट गांजवे, शिवाजी नाठे, दीपक सोनवणे, गोरख सोनवणे, भगीरथ माळी, सुनील माळी, बाळू नाठे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)