शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव पोलीस ठाण्यात ट्रिंग ट्रिंग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:31 IST

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलीस ठाण्याचा टेलिफोन पंधरा दिवसांपासून बंद असल्याने पिंपळगाववासीय हैराण झाले आहेत. एखाद्या घटनेची तक्रार कशी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंधरा दिवस होऊनही पोलिसांनी सेवा सुरू करून घेण्याची तसदी घेतलेली नसल्यामुळे २४ गावांची हद्द राखणारे हद्दपार झाल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देतक्र ारदार हैराण : टेलिफोनचे बिल थकल्याने सेवा खंडित

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलीस ठाण्याचा टेलिफोन पंधरा दिवसांपासून बंद असल्याने पिंपळगाववासीय हैराण झाले आहेत. एखाद्या घटनेची तक्रार कशी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंधरा दिवस होऊनही पोलिसांनी सेवा सुरू करून घेण्याची तसदी घेतलेली नसल्यामुळे २४ गावांची हद्द राखणारे हद्दपार झाल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात बीएसएनएलची दूरध्वनी सेवा आहे. मात्र सेवा पंधरा दिवसांपासून बंद आहेत. परिसरातील हैराण झालेल्या नागरिकांना एखादी तक्रार करण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे गाठावे लागत आहे. पिंपळगाव शहर व परिसरातील गावे मिळून या पोलीस ठाण्याच्या परिसरात २४ गावांचा परिसर आहेत. या सर्व गावांची लोकसंख्यादेखील पाच लाखांच्या पुढे आहे. परंतु पोलीस ठाण्याची अत्यावश्यक सेवा देणारा टेलिफोनच बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, पोलीस चौकी ही नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची असते. चौकीतील फोन बंद असल्यामुळे मोबाइलवरूनच फोन करावा लागतो. कधी कधी मोबाइलला रेंज नसते अशा वेळी चौकीतील दूरध्वनी महत्त्वाचे ठरतात. मात्र, तेच बंद असल्यामुळे त्याचा कामावर परिणाम होतो. चौकीत तक्र ार आल्यानंतर त्याची माहिती पोलीस ठाण्याला देणे, इतर कार्यालयीन कामांची माहिती देणे अडचणीचे ठरते. त्यावेळी येथील कर्मचारी आपल्या मोबाइलवरून माहिती देतात तर कधी पोलीस ठाण्याच्या अंमलदाराला ‘मिस्ड कॉल’ देतात. त्यानंतर परत फोन करून माहिती घेतली जाते. सुरक्षा व शांतता राखणारेच कव्हरेच क्षेत्राच्या बाहेर असल्याने सामान्य तक्रारदारांना तक्रार दाखल करायला पायपीट करत पोलीस ठाणे गाठावे लागत आहे.बीएसएनएलच्या वरिष्ठ कार्यालयात संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, पिंपळगाव पोलीस ठाण्यातील दूरध्वनीचे पंधरा दिवसांपासून बिल थकल्यामुळे सेवा बंद केली आहे. पोलीस कार्यालयाकडून बिल भरणे शक्य झालेले नाही तर बिलाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, ती पार पाडण्याची मोठी प्रक्रि या आहे. याबाबत आमचा वरिष्ठ स्तरावरून पाठपुरावा असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिस