शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

त्र्यंबकवासीय त्रस्त

By admin | Updated: December 27, 2016 23:20 IST

त्र्यंबकवासीय त्रस्त

संताप : कचरा साफ करण्याची मागणीत्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचा कचरा डेपो थेट नागरी वस्तीपर्यंत पोहोचला होता. याबाबत लोकांनी अनेक तक्र ारी केल्या. शेवटी पालिकेने डंपिंग रस्त्यावरील संपूर्ण कचरा हटविला. पालिकेच्या लाकडाच्या वखारीसाठी ठेवलेल्या गुदामासमोरील प्रांगणदेखील कचऱ्याने पूर्णपणे भरले होते, तेही आता स्वच्छ झाले आहे. त्याबद्दल पालिकेस धन्यवाद दिले पाहिजे. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेची कचरा विल्हेवाटीची समस्या तरी अजूनही मिटलेली नाही. वास्तविक नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम कचरा डेपोची समस्या मिटविण्यासाठी प्राधान्यक्रम देईल. तथापि, कार्यभार स्वीकारून वर्ष झाले आहे पण कचरा विल्हेवाटीची समस्या अजूनही ‘जैसे थे’च आहे. याबाबत हरित लवादाने पालिकेवर ठपकाही ठेवला आहे. तरीही पालिकेला कचरा विल्हेवाट करता आली नाही. कचरा डेपोची समस्या तशी आजची नाही. पण कचरा विल्हेवाटीचा प्रश्न मीच सोडविणार अशी ग्वाही नगराध्यक्ष विजया दीपक लढ्ढा यांनी दिली होती. अर्थात त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते. त्यानंतर मात्र माशी कुठे शिंकली कोण जाणे ! त्यानंतर मात्र त्यांनी केलेली घोषणा हवेत विरली. (वार्ताहर) कचरा विल्हेवाटीचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून गोरक्षनाथ घाट बांधला. या बाजूला कचरा डेपो होता. सिंहस्थ असेपर्यंत घाट व्यवस्थित होता. त्यानंतर मात्र घाटाची दुर्दशा झाली. पवित्र गोदामाईची आज गटारगंगा झाली आहे. या घाटापर्यंत कचऱ्याचे ढीग होते. अर्थात आता येथे कचरा नाही. पण सर्वच घाट साफ होणे गरजेचे आहे. तसेच उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी व कचरा डेपोची प्रलंबित समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.