शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

त्र्यंबककरांना संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे वेध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 13:38 IST

त्र्यंबकेश्वर : पौष वद्य एकादशी अर्थात (२० जानेवारी) रोजी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेचे रहिवाशांसह वारकऱ्यांना वेध लागले आहेत.  ...

त्र्यंबकेश्वर : पौष वद्य एकादशी अर्थात (२० जानेवारी) रोजी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेचे रहिवाशांसह वारकऱ्यांना वेध लागले आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या दालनात श्रीनिवृत्तीनाथ महाराज यात्रा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तर साधारण पुढील आठवड्यात प्रांताधिकारी यांची यात्रा नियोजन बैठक होईल. त्यानंतर पोलीस बंदोबस्त नियोजन बैठक व शेवटी यात्रा चार पाच दिवसांवर आल्यानंतर नगरपरिषदेची नियोजन बैठक होत असते. यात्रेसाठी आवश्यक साहित्य जंतुनाशके फनेल टीसीएल पावडर आलम बीएचसी पावडर आदी खरेदीची मंजुरी घेण्या करिता विशेष सभा बोलाविण्यात येणार आहे.दरम्यान निवृत्तीनाथ यात्रेच्या पाशर््वभूमीवर ज्या लोकांचे नेहमीचे व्यवसाय नाहीत असे लोकही फक्त यात्रा कालाविधतले तीन दिवस व नेहमीच्या व्यावसायिकांनी यात्रेत विक्र ी करावयाचा प्रसादी वाण आणण्यास तयारीप्रारंभ केला आहे. यात प्रसाद विक्र ी हॉटेल व्यवसायासाठी लागणारा माल तसेच यात्रा जेथे भरते त्या रस्त्यावर ठिकठिकाणी बहुतेक घरमालक आपल्या घरापुढील जागेत टेंपररी व्यवसाय करतात. काही घरमालक व्यवसाय न करता जागा भाड्याने देणे पसंत करतात.अशा व्यावसायिकांनी जय्यत तयारी करणे सुरु केले आहे. विजेचे पाळणे चक्री मिकी माउस जंपिंग स्लाईड आदी मुलांचे खेळ शहरात लवकर दाखल होतात व यात्रा संपल्यानंतरही उशीराने शहर सोडतात. पालिकेनेही निवृत्तीनाथ यात्रेसाठी लागणारे जंतुनाशके आरोग्य विभागाचे साहित्य यात्रेत लावण्यासाठी तात्पुरत्या नळपोस्टसाठी आवश्यक साहित्य पथदीपांसाठी लागणारे विद्युत साहित्य आदींची खरेदी करण्यासाठी पालिका लवकरच निविदा प्रसिध्दी करतील अशी शक्यता आहे. होलसेल प्रसादी साहित्य विक्र ीची दुकाने गजबजली आहेत.संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रे साठी आळंदी सासवड मुक्ताईनगर सोलापुर आदी महाराष्ट्रातून दुरवरु न विविध ठिकाणच्या पायी दिंड्या आता त्र्यंबकेश्वरची वाट तुडवत जीवघेण्या थंडीत दुपारच्या उन्हाची पर्वा न करता निवृत्तीरायांना भेटण्यासाठी नाम संकीर्तन करीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरची वाट जवळ करीत पाउले चालती निवृत्तीची वाट ! या उक्तीप्रमाणे येत असतात.

टॅग्स :Nashikनाशिक