शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

त्र्यंबकेश्वरची उटीची वारी यंदाही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 00:25 IST

नाशिक : येत्या शुक्रवारी (दि.७) वरुथिनी एकादशीला होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या उटीच्या वारीला सलग दुसऱ्या वर्षीही भाविक वारकऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना या वारीलाही मुकावे लागणार आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा कहर : मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत होणार विधी

नाशिक : येत्या शुक्रवारी (दि.७) वरुथिनी एकादशीला होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या उटीच्या वारीला सलग दुसऱ्या वर्षीही भाविक वारकऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना या वारीलाही मुकावे लागणार आहे.उटीची वारी म्हणजे श्रीसंतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची 'मिनी निवृत्तीनाथ यात्रा' मानली जाते. मे महिन्यातील उन्हाच्या तीव्रतेपासून मनुष्यासह पशू-पक्ष्यांना उन्हाचा दाह सहन होत नाही. संत निवृत्तीनाथ महाराज यांनी ७२४ वर्षांपूर्वी आपले अवतारकार्य संपवीत त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. तथापि, आजही श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांचा आत्मा संजीवन समाधीच्या गुहेत वास करीत असल्याच्या श्रद्धा भावनेतून दरवर्षी उटीच्या वारीला लाखो भाविक त्र्यंबकेश्वरी येत असतात; परंतु मागील वर्षी जूनपासूनच कोरोनाचा शिरकाव त्र्यंबकेश्वरमध्ये झाला. मध्यंतरी कोरोनाचा कहर कमी झाला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. परिणामी येत्या शुक्रवारी (दि.७) भरणारी उटीच्या वारीची यात्रा कडक निर्बंधांमुळे रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात संत निवृत्तीनाथ महाराज प्रशासकीय समितीची बैठक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील के. एम. सोनवणे, ॲड. भाऊसाहेब गंभिरे, मुख्याधिकारी संजय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या उपस्थितीत होऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही उटीची वारी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे ठरविण्यात आले.परंपरेप्रमाणे मंदिरात यंदाही सप्ताह बसविण्यात आला आहे. चंदनाची खोडे उटी तथा गंध म्हणून उगाळली जात आहेत. दैनंदिन धार्मिक पूजा-आरती विधी सुरू आहेत. दरम्यान, देवाच्या संजीवन समाधीला आतील गाभाऱ्यात उष्णतेचा दाह जाणवू नये म्हणून उटीच्या वारीच्या दिवशी दुपारी १२ वाजेपासून चंदनाचे लेपन केले जाणार आहे. हे लेपन चढविल्यानंतर रात्री १० वाजता संजीवन समाधीवरील उटीचे लेपन धुण्यास सुरुवात होते आणि हीच उटी भाविक-वारकरी यांच्या अंगावर शिंपडली जाते. अनेक भाविका उटीचा प्रसाद आपल्या गावी नेतात. मात्र, यंदा या विधीला भाविक मुकणार आहेत.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर