शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 18:26 IST

त्र्यंबकेश्वर : शहरात नगरपालिकेतर्फे रविवारपासून ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांनी दिली. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, तक्र ारी ऐकून त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. पालिकेविषयी नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देपालिकेने अभिलेख संगणकीकरण मशीन खरेदी करून पालिकेचा संगणकीकरण अभिलेख कक्ष साकारला

त्र्यंबकेश्वर : शहरात नगरपालिकेतर्फे रविवारपासून ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांनी दिली. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, तक्र ारी ऐकून त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. पालिकेविषयी नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.शेलार यांनी सर्व कामगार, कार्यालयीन कर्मचारी, सफाई ठेकेदार, पाणीपुरवठा ठेकेदार, नगरसेवक आदींची संयुक्त बैठक बोलावून त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या. कामगारांसाठी विमा पॉलिसी सुरू करण्यात आली असून, कामगारांनी प्रामाणिकपणे कामे करावीत, अशा सूचना शेलार यांनी यावेळी दिल्या.नगरसेवकांच्या सहकार्यातून शहरातील अपंगांना दरमहा पाच हजार रुपये मानधन सुरू करण्यात आले आहे. मागील फरक पंचवीस ते तीस हजार रु पये धनादेशाच्या स्वरुपात अदा करण्यात आले. आर्थिक दुर्बल घटकातील गरीब व होतकरू दोन गुणवंत विद्यार्थ्यांना पालिका दत्तक घेणार असून, त्यांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा खर्च पालिका उचलणार आहे. यावर्षी दोन मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. अपंगांना हक्काचे घर मिळावे या हेतूने लवकरच इमारत साकारण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. याशिवाय सर्वच कामगार व कर्मचाऱ्यांना दिवाळीत सानुग्रह अनुदान देऊन त्यांच्या आनंदात पालिका सामील झाली. सुशिक्षित बेरोजगारांसाठी, विस्थापित टपरीधारकांना पालिकेतर्फे गाळे देण्यात येणार आहे. पालिकेने अभिलेख संगणकीकरण मशीन खरेदी करून पालिकेचा संगणकीकरण अभिलेख कक्ष साकारला आहे, अशी माहिती प्रभारी नगरसेवक शेलार यांनी दिली.