शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
6
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
7
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
8
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
9
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
10
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
11
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
12
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
13
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
14
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
15
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
16
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
17
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
18
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
19
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
20
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...

त्र्यंबकेश्वरला पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:49 IST

त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. एकट्या त्र्यंबकेश्वर शहराला नगर परिषदेतर्फे तीन जलाशयातून पाणीपुरवठा होत असतो. तथापि या तीनही जलाशयांचा साठा आटल्याने त्र्यंबककवासीयांना दिवसाआड पाणी पिण्याची वेळ आली आहे. शहराला यावर्षी उशिराने पाणीटंचाई सुरू झाली.

त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. एकट्या त्र्यंबकेश्वर शहराला नगर परिषदेतर्फे तीन जलाशयातून पाणीपुरवठा होत असतो. तथापि या तीनही जलाशयांचा साठा आटल्याने त्र्यंबककवासीयांना दिवसाआड पाणी पिण्याची वेळ आली आहे.शहराला यावर्षी उशिराने पाणीटंचाई सुरू झाली. सन २०१९ मध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने यावर्षी टंचाई उशिराने सुरू झाली. अर्थात त्र्यंबकेश्वर शहराला टंचाई परिस्थिती भासण्याची तशी काही गरज नाही. त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यास ३/४ वर्षांचा अवधी राहिल्यास सिंहस्थ नियोजनाची कामे सुरू केली जातात. त्यात सर्व प्रथम पाण्याला प्राधान्य दिले जाते.गेल्या ३६ वर्षांत तीन वेळा त्र्यंबकच्या पाणीपुरवठा योजना शासनातर्फे तयार केल्या गेल्या. १९९०-९१ साली अंबोली लघुपाटबंधारे धरणातून त्र्यंबकेश्वरला थेट पाइपलाइनद्वारे ११ किलोमीटर अंतरावरून योजना तयार करण्यात आली. सन २००३-०४ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात अंबोली सुधारित योजना अंमलात आली. यात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलवाहिनी करत योजना तयार करण्यात आली होती. सन २०१५-१६ साली गौतमी गोदावरी प्रकल्प अंमलात आणला गेला. गौतमी गोदा धरणातून त्र्यंबकेश्वरसाठी फक्त १० टक्के पाणी राखीव आहे. बेझे धरण मुळातच मराठवाडा विभागासाठी असल्याने ऐन उन्हाळ्यात व त्यापूर्वीदेखील मराठवाडा विभागाकडे विसर्ग केला जातो. साहजिकच बेझे धरणात त्र्यंबकसाठी आरक्षित असलेले १० टक्के पाणी मिळणे अशक्य असते.----------------

 त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मालकीचे अहिल्या धरण, अंबोली धरण व बेझे धरण अशा तीनही धरणात पाण्याचा साठा आटल्याने त्र्यंबकेश्वरसाठी दिवसाआड पाणीपुरवठ्याचा पर्याय पालिकेने जाहीर केला आहे. यात दोन झोनमध्ये अवघे ४० मिनिटे पाणी सोडले जाणार आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक