शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला चांदीचा पंचमुखी मुखवटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:58 IST

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला औरंगाबाद येथील उद्योजक शेखर चंपालाल देसरडा आणि परिवाराकडून १५ किलो वजनाचा चांदीचा मुखवटा प्रदान करण्यात आला. या निमित्ताने एका समारंभाचे आयोजन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फेकरण्यात आले

ठळक मुद्देऔरंगाबादच्या देसरडा परिवाराकडून देणगी !

त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला औरंगाबाद येथील उद्योजक शेखर चंपालाल देसरडा आणि परिवाराकडून १५ किलो वजनाचा चांदीचा मुखवटा प्रदान करण्यात आला. या निमित्ताने एका समारंभाचे आयोजन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फेकरण्यात आले होते. यापूर्वीही देसरडा परिवाराकडून त्र्यंबकराजाच्या दैनंदिन त्रिकाल पूजेसाठी चांदीच्या भांड्यांचा सेट दान करण्यात आला होता.हा पंचमुखी चांदीचा मुखवटा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष न्या. एम. एस. बोधनकर यांनी खास समारंभात स्वीकारला. आपल्या अध्यक्षीय भाषणात न्या. बोधनकर यांनी देसरडा परिवाराचे आभार मानले. यावेळी विश्वस्त संतोष कदम यांनी मुखवटा तयार करण्यामागची पूर्वपीठिका सांगितली. मुखवटा बनविणारे मैंद बंधू व सचिन पाचोरकर यांचा देसरडा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी केले. सूत्रसंचालन अतुल तथा गिरीश जोशी यांनी केले. या कार्यक्रमास देसरडा परिवार, दिलीप तुंगार, संतोष दिघे, पंकज भुतडा, संतोष कदम, तृप्ती धारणे, उल्हास आराधी, प्रभावती तुंगार, मधुकर कडलग, पंकज धारणे, सुरेश पाडेकर, डॉ. दिलीप जोशी, कैलास भुतडा, अमर सोनवणे व महिलावर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.शिखरावरील पंचलिंगाचे प्रतीक म्हणून पंचमुखी मुखवटाविश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी पंचमुखी मुखवटा का याबाबत विश्लेषण केले. त्र्यंबकेश्वर हे सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेले आहे. या पर्वतरांगेत ब्रह्मगिरी व गंगाद्वार हे दोन पर्वत आहेत. ब्रह्मगिरीवर गोदावरीचा उगम झाला. ब्रह्मगिरीच्या उंच शिखरावर पंचलिंग आहेत. ही पंचलिंगे म्हणजे वामदेव, अघोर, इशान, सद्योजात व तत्पुरु ष आहेत. या पंचलिंगाचे प्रतीक म्हणून पंचमुखी मुखवटा तयार करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरReligious programmeधार्मिक कार्यक्रम