शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

त्र्यंबकेश्वरचा नदीकाठ पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 18:10 IST

तिसऱ्यांदा पूर : संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

ठळक मुद्देआषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जलपुजन करण्याचा मानस

त्र्यंबकेश्वर : शहर व परिसरात संततधार पावसामुळे पुन्हा एकदा शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. गोदावरी नदीसह निलगंगा व म्हातार ओहळाला पुर आल्याने नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसले. बुधवारी रात्रभर पावसाचा जोर सुरू होता.शहरात आतापर्यंत तिसऱ्यांदा पुर आला आहे. गेल्या रविवारी (दि.७) आलेल्या पुरामुळे शहर जलमय झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. हा पूर ओसरत नाही तोच बुधवारपासून सुरू झालेल्या पावसाने पुन्हा एकदा शहरातील काही भाग पाण्यात गेला. तेली गल्लीत निलगंगेचे पाणी नेहमीच घुसत असते. त्यामुळे संपुर्ण तेलीगल्लीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या घरांना कायम पुराच्या पाण्याशी सामना करावा लागतो. संपुर्ण मेनरोड वरील निवासी घरे व दुकाने आदिंचा तळमजला पाण्यात जात असतो. दरम्यान, बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरात काही भागात पुन्हा एकदा पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. नदीकाठ परिसरातील अनेक दुकाने व घरांमध्ये पाणी घुसले होते. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूर ओसरायला सुरूवात झाली. सोमवारी (दि.८) सकाळी आठ वाजेपर्यंत अंबोली धरण जवळपास ९० टक्के भरले होते. बेझे वगळता अंबोली-अहल्या धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जलपुजन करण्याचा मानस नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी बोलुन दाखविला.

टॅग्स :Nashikनाशिक