शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

त्र्यंबकेश्वरला चौथ्या सोमवारसाठी सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 15:29 IST

त्र्यंबकेश्वर : येत्या चौथ्या आणि श्रावणातील अंतिम सोमवारी त्र्यंबकेश्वरला गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून येथे प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन असल्याने अनेकांना यावयास जमले नव्हते. त्यामुळे भाविक चौथ्या सोमवारी निश्चित येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. गत तिन्ही सोमवारी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद पोलीस सेवा आरोग्य सेवा ...

त्र्यंबकेश्वर : येत्या चौथ्या आणि श्रावणातील अंतिम सोमवारी त्र्यंबकेश्वरला गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून येथे प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन असल्याने अनेकांना यावयास जमले नव्हते. त्यामुळे भाविक चौथ्या सोमवारी निश्चित येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. गत तिन्ही सोमवारी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद पोलीस सेवा आरोग्य सेवा आदींनी जसे नियोजन केले होते तसेच ठेवले जाणार आहेत. कदाचित मनुष्यबळात थोडा फार फरक पडु शकतो. शेवटच्या सोमवारी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात शासकीय यंत्रणांना गर्दी होईल असे गृहीत धरूनच नियोजन करावे लागणार आहे. कारण पहिल्याच सोमवारी मंदीरात प्रचंड गर्दी होउन पुर्व बाजुकडील दर्शन बारी ओसंडुन बाहेरही रांगा लागल्या होत्या. यावेळेस देखील तसे होण्याची शक्यता आहे. यावेळेस शक्यतो परिक्र मेसाठी भाविक कमी जातील पण दर्शनाला महत्व देतील. त्यादृष्टीने मंदीर प्रशासनाची तयारी आहे. कितीही दर्शनार्थी आले तरी दर्शन सुलभ होईल याबाबत विश्वस्त मंडळ दक्ष आहे. देवस्थानचे अध्यक्ष न्या.बोधनकर तसेच विश्वस्त दिलीप तुंगार , प्रशांत गायधनी, अ‍ॅड. संतोष दिघे , अ‍ॅड.पंकज भुतडा, संतोष कदम व तृप्ती धारणे आदी उपस्थित होते.यावेळेस देखील नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, गटनेते समीर पाटणकर, यात्रा सभापती विष्णु दोबाडे , मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरु रे आदी नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. पोलीस प्रशासनाने देखील मागच्या तीनही बंदोबस्ताप्रमाणेच या शेवटच्या आणि अंतिम सोमवारी तयारी केली आहे. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे सोनवे यांनी सांगितले. यापुर्वीचे तीनही श्रावण समवार शांतेतेत पार पडले. तसा हाही सोमवार शांततेत व निर्विघ्न पार पडेल अशी अपेक्षा आहे. यावेळी पोउनि सुरेश चौधरी, कैलास आकुले किरण मेहेर आदी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक