शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला पुन्हा जमीन घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 02:00 IST

त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानची दोनशे कोटी रुपये किमतीची शेकडो एकर जमीन विनापरवाना परस्पर विक्री केल्याच्या घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच त्र्यंबकेश्वरच्या शंभू पंचायत अटल आखाड्याची ८१ आर जमिनीची परस्पर विक्री करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानची दोनशे कोटी रुपये किमतीची शेकडो एकर जमीन विनापरवाना परस्पर विक्री केल्याच्या घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच त्र्यंबकेश्वरच्या शंभू पंचायत अटल आखाड्याची ८१ आर जमिनीची परस्पर विक्री करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात आखाड्याने जिल्हाधिकाºयांच्या लोकशाही दिनात तक्रार करून लक्ष वेधले असून, त्याबाबतचे कागदपत्रे मागविण्यात आले आहेत. शंभू पंचायत अटल दशनाम नागा आखाड्याच्या मालकीची त्र्यंबकेश्वर येथे गट नंबर ३५/१/१ मध्ये १७.७ हेक्टर आर जमीन असून, सदर आखाड्याची धर्मादाय संस्थेमार्फत नोंदणीही  झालेली आहे. साधारणत: सन २०१६ मध्ये या आखाड्याच्या एकूण जमिनीतील ८१ आर क्षेत्राचा तुकडा पाडून त्यावरील इनाम ही नोंद काढून टाकण्यात आली व काही विश्वस्तांना हाताशीधरून या जमिनीची परस्पर विक्री करण्यात आली.  सदर बाब आखाड्याच्या लक्षात येताच त्यांनी यापूर्वी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सर्व कागदपत्रांनिशी तक्रार करण्यात आली असता त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. सोमवारी जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत झालेल्या लोकशाही दिनात या संदर्भात आखाड्याच्या प्रमुखांनी तक्रार केली आहे. त्र्यंबकेश्वरचे तत्कालीन तहसीलदार नरेश बहिरम यांच्यासह १४ जणांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांना विचारणा केली असता, त्यांनी तक्रारीची दखल घेण्यात आल्याचे तसेच तक्रारदारांकडून आणखी काही पुराव्यांची मागणी केली आहे. सदरची बाब अर्धन्यायिक असल्याने तहसीलदारांच्या आदेशाविरुद्ध अपील करण्याची तरतूद आहे, तशा सूचना आपण संबंधितांना दिल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले. जिल्ह्णातील महसूल यंत्रणेकडून जागामालक, बांधकाम व्यावसायिक यांच्याशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळ्याला अभय दिले जात असल्याचे प्रकार वारंवार घडू लागले असून, त्यातून सर्वच अधिकाºयांकडे संशयाने पाहिले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक