शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

त्र्यंबकेश्वर दुुमदुमले

By admin | Updated: August 16, 2016 22:40 IST

बम बम भोले : दुसऱ्या श्रावणी सोमवारसह सुट्यांची पर्वणी

त्र्यंबकेश्वर : येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर आणि त्यातच सलग सुट्यांची पर्वणी साधत सुमारे एक ते दीड लाख भाविकांनी त्र्यंबकेश्वर दर्शनाचा लाभ घेतला, तर सुमारे एक लाख भाविकांनी परिक्रमा पूर्ण केली. पहिल्या सोमवारी फारशी गर्दी नव्हती, पण दुसऱ्या सोमवारी मात्र तिसऱ्या सोमवारच्या गर्दीचा अनुभव आला. मध्यरात्री १२ वाजेपासून भोलेहरचा जयघोष सुरू होता. त्र्यंबकेश्वर गावाबाहेर जिकडे पाहावे तिकडे खासगी वाहनेच दिसत होती.श्रावण महिना म्हणजे व्रत- वैकल्याचा महिना. सर्वात जास्त सणवार, व्रतवैकल्ये याच महिन्यात असतात. या महिन्यात साधारणत:‘श्रावणमासी हर्ष मानसी।हिरवळ दाटे चोहीकडेक्षणात येते सरसर शिरवे।क्षणात फिरुनी ऊन पडे’असा पावसाचा अनुभव असल्याने भाविक-पर्यटकांनादेखील हा अनुभव सुखद वाटतो. ब्रह्मगिरी परिक्रमा (फेरी) म्हणजे एक स्वर्गीय आनंद असतो. दऱ्या-खोऱ्या तुडवित, जोडीला निसर्गसौंदर्याचा अवर्णनीय अनुभव घेत भाविक चालत असतो. याशिवाय जमेची बाब म्हणजे खाली रस्तादेखील कॉँक्रिटीकरण झालेला असल्याने भाविक ब्रह्मगिरी फेरीची वाट तुडवित असतो. परतीच्या वाटेवर शेवटी भाविक अक्षरश: मलुल झालेला असतो. मंदिराच्या पूर्व दरवाजासमोरील २५ रांगा ओसंडून रांग थेट जुन्या जकात नाक्यापर्यंत पोहचली होती यावरून गर्दीचा अंदाज येऊ शकतो. उत्तर महादरवाजासमोरदेखील पेड दर्शन बंद करण्यात येऊन महादरवाजा बंद करण्यात आला होता. त्यामुळे असंख्य भाविकांनी दरवाजावरच फुले वाहून दर्शन घेऊन समाधान मानून घेतले. अनेकांनी कळसाचे तर लाइव्ह पूजा-दर्शन दिसत असल्याने भाविक समाधान मानत होते. पूर्व दरवाजाने दर्शन म्हणजे ५ ते ६ तास वेटिंग होय. दुसरा श्रावणी सोमवार अशा अनेक कारणांनी गाजला. तथापि, एवढे मात्र खरे की देवस्थानने दर्शन व्यवस्थेचे नियोजन अत्यंत चांगले केले असल्याने कुठलाही गोंधळ-हाणामारीचे प्रसंग उद्भवले नाहीत. यासाठी देवस्थानचे अधिकारी समीर वैद्य, अमित टोकेकर, राजाभाऊ जोशी, जाधव, यादव, भांगरे आदि सारखे फिरत होते. संतोष कदम यांनी जातीने फिरून स्वच्छता, पाणी व स्ट्रीट लाईटची पाहणी आपल्या सहकाऱ्यांसह करत होते. दरम्यान, पुढील सोमवारी अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. यावेळी पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवेची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती. निर्मला गावित यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. (वार्ताहर)