शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

थंडीतही त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 18:30 IST

त्र्यंबकेश्वर : परिसर व संपुर्ण तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असुन थंडीचाही कडाका वाढला आहे. रात्री ८ ते ९ डिग्री सेल्सीयस तापमान असते.

ठळक मुद्देपंधरा दिवसांपासुन ढगाळ वातावरण; रब्बीवर प्रतिकूल परिणाम

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : परिसर व संपुर्ण तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असुन थंडीचाही कडाका वाढला आहे. रात्री ८ ते ९ डिग्री सेल्सीयस तापमान असते. तर दिवसा उन सावल्यांच्या खेळात तापमान अवघे २५ ते २७ डिग्री सेल्सीयस असते. त्यामुळे दिवसा देखील गरम कपडे घालुन वावरावे लागते. अशा परिस्थितीत देखील शनिवार रविवार अशा विकेंडला सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटकांची येथे प्रचंड गर्दी होत आहे.१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आगळे वेगळे वैशिष्टय असलेले ज्योतिर्लिंग. दक्षिण भारताला सुजलाम सुफलाम करणारी दक्षिण गंगा गोदावरीचे उगम स्थान १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा येथेच भरतो. संपुर्ण श्रावण महिना व या महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी सिंहस्थ सदृश्य पर्वणी एवढी गर्दी होत असते. नारायण नागबली सारखे धार्मिक विधी येथेच होत असल्याने येथे नेहमीच गर्दीचा सुकाळ असतो. अशा परिस्थितीत देखील भाविकांचा सततचा राबता येथे असतो.शहरात असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीराच्या पार्श्वभूमीवर नुकतीच २० जानेवारी रोजी संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरली होती. यात्रेच्या निमित्ताने आलेले गरम व उलनचे कपडे ब्लँकेट विक्र ेते यांचा मुक्काम अजुनही त्र्यंबकेश्वरला आहे.दरम्यान सध्या असलेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम रब्बी गहु, हरबरा, मसुर, द्राक्ष आदी पिकांवर प्रतिकुल पडत आहे. हे वातावरण असेच होत राहीले तर गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर काही शेतकऱ्यांच्या गव्हावर तांबेराचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या कानावर येत आहेत.

टॅग्स :Templeमंदिरtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर