शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

त्र्यंबकेश्वरला महाशिवरात्र उत्साहात

By admin | Updated: February 18, 2015 00:27 IST

त्र्यंबकेश्वरला महाशिवरात्र उत्साहात

त्र्यंबकेश्वर : महाशिवरात्र असल्याने संपूर्ण त्र्यंबकनगरी उत्साहात न्हाऊन निघाली होती. संपूर्ण शहरात हर हर महादेवचा जयघोष सुरू होता, तर आपला नंबर लागेपर्यंत दर्शनार्थीचे भजन सुरू होते. त्र्यंबकेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.सोमवारी रात्री जयतीर्थ यांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी स्कूल आॅफ आर्टिलरीतर्फे बँड पथकाची सलामी देण्यात आली, तर मंगळवारी नटराज मंडळातर्फे ओम नटराज नृत्य मंडळाचा गंगावतरण कार्यक्रम झाला. संपूर्ण मंदिर परिसरात धार्मिक वातावरण होते.दरम्यान, दुपारी ३.१५ वाजता पालखी उत्सवास सुरुवात झाली. आज पाचआळीमार्गे पालखी श्री जोगळेकर यांच्या वाड्यावरून मिरवणुकीने तीर्थराज कुशावर्तावर आणण्यात आली. तेथे पूजाविधी झाला. त्यानंतर परत पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरात आणण्यात आली. मिरवणुकीत विलास मोरे यांचे नाशिकरोड चौघडा असे होते. देवस्थानचे दर सोमवारचे वाजंत्री होते. देवाचा पंचमुखी मुखवटा आज फिरविण्यात आला.खजूर, कवठ, उसाचा रस, बेलतीर्थ यांना मोठी मागणी होती. कवठ ५ ते १० रुपयाला १ या प्रमाणे विकली गेली. तसेच फराळांच्या पदार्थांनाही बऱ्यापैकी मागणी होती. विशेष म्हणजे आजची गर्दी जास्त प्रमाणात दिसून आली नाही.(वार्ताहर)