शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकला प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 19:06 IST

तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त (दि.१९) त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या होणाºया गर्दीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद, तालुका तहसील कार्यालय, पोलीस यंत्रणा, परिवहन महामंडळ, वीज, वनविभाग, उपजिल्हा रु ग्णालय आदी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर : तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त (दि.१९) त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या होणाºया गर्दीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद, तालुका तहसील कार्यालय, पोलीस यंत्रणा, परिवहन महामंडळ, वीज, वनविभाग, उपजिल्हा रु ग्णालय आदी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. रविवारीदेखील (दि.१८) नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी पेठ-त्र्यंबकेश्वरचे उपाधीक्षक भीमाशंकर ढोले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांच्यासह गावात पायी फिरून बंदोबस्ताचे नियोजन केले. त्र्यंबकेश्वर मंदिरातदेखील बंदोबस्ताचे नियोजन केले.रविवारीच गावात भाविकांनी गर्दी केली आहे. सोमवारी गावात खासगी वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. यावर्षी तिसºया श्रावण सोमवारी भाविकांना अनुकूल परिस्थिती असल्याने प्रदक्षिणार्थींची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. रविवारी रात्री नऊ-दहा वाजता परिक्र मा करण्यास निघतील. काही भाविक रात्री १२ वाजेपासून फेरीस जात असतात. वयोवृद्ध भाविक पहाटे चार-पाच वाजेपासून फेरीस सुरु वात करतात. दुपार नंतर परत येतात.प्रदक्षिणा करणाऱ्यांनी रस्त्यावर प्लॅस्टिक कचरा, कागद, बाटल्या रस्त्याच्या बाजूला टाकू नये. शेत तुडवित जाऊ नये. शेतीचे नुकसान करू नये, असे फेरी मार्गावरील शेतकरी बांधवांनी कळविले आहे.त्र्यंबकेश्वरला कडेकोट पोलीस बंदोबस्त१ अपर पोलीस अधीक्षक, ३ पोलीस उपाधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, २८ सहायक पोलीस निरीक्षक, ४३ वाहतूक पोलीस, २८० पोलीस कर्मचारी, ८० महिला पोलीस, ७०० होमगार्ड, २ बीडीडीएस पथक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज आहेत. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरReligious programmeधार्मिक कार्यक्रम