शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘मनरेगा’ला सरकारकडून हरताळ त्र्यंबकेश्वर : शंभर दिवसांच्या रोजगारानंतर युवक बेकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:44 IST

‘मागेल त्याला काम व कामाची हमी’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेतून मनरेगाची निर्मिती झाली आहे; मात्र ही संकल्पना फक्त १०० दिवसांपुरता मर्यादित आहे.

त्र्यंबकेश्वर : ‘मागेल त्याला काम व कामाची हमी’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेतून मनरेगाची निर्मिती झाली आहे; मात्र ही संकल्पना फक्त १०० दिवसांपुरता मर्यादित आहे. रोजगाराचे १०० दिवस पूर्ण झाले की त्यांना बेरोजगार व्हावे लागते, तर ही संकल्पना फसवी म्हणायची काय, असा सवाल ग्रामीण भागातील बेरोजगार ठरलेल्या युवकांनी केला आहे. तर १०० दिवसांनंतर पुढील रोजगाराची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी मागणी त्र्यंबक पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र भोये यांनी तहसीलदार महेंद्र पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.हरसूल येथील वनविकास महामंडळाचे मनरेगा अंतर्गत काम सुरू आहे; मात्र कामगारांचे मजुरीचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर या सर्व कामगारांना काम देण्यास नाकारण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र भोये यांनी बेरोजगार होऊन घरी बसलेल्या मजुरांना काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत राज्य सरकारकडे केली आहे. यावेळी हरसूल येथील २०० ते २५० बेरोजगार उपस्थित होते. ‘मागेल त्याला काम व कामाची हमी’ ही योजना केंद्र सरकारची असून, एका कुटुंबातील ४ मजूर कामावर असले तर १०० दिवसांची विभागणी होऊन अवघ्या २५ दिवसांतच त्या कुटुंबाचे १०० दिवसांचे उद्दिष्ट पूर्ण धरले जात आहे. वास्तविक मुले मोठी झाल्यानंतर विवाह होतो. आणि विभक्त राहावयास गेले तरी स्वतंत्र शिधापत्रिकेअभावी असे कुटुंब मात्र एकत्रित धरले जाते. नवीन शिधापत्रिका मिळणे किती अवघड आहे, त्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेलच ! आदिवासी बेरोजगारांना रोजगाराची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून देण्याची गरज आहे ती त्यांची जबाबदारी आहे, दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मजुरीचे १०० दिवसांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर या कामगारांना काम देण्यास नकार दिला जातो. परिणामी कामगारास घरी बसावे लागते. यामुळे संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. हरसूल परिसरात दोन ते अडीच हजार लोक बेरोजगार झालेले असतील.यावेळी तहसीलदार महेंद्र पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन ईजीएस मनरेगा उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. रवींद्र भोये यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशीदेखील संपर्क साधून पाठपुरावा सुरू केला आहे.