शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वैकुंठी चतुर्दशीसाठी त्र्यंबक सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:11 IST

वैकुंठी चतुर्दशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पारंपरिक रथ मिरवणुकीसाठी देवस्थान संस्थान सज्ज झाले आहे. देशातील जगन्नाथपुरीच्या खालोखाल या रथाचा क्रमांक लागतो. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पदरी भव्य रथ आहे. आहे. त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचा रथ पेशवेकालीन सरदार रघुनाथराव विंचूरकर यांनी सन १७३७ संस्थानला प्रदान केला आहे.

ठळक मुद्देपेशवेकालीन रथ : दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

त्र्यंबकेश्वर : वैकुंठी चतुर्दशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पारंपरिक रथ मिरवणुकीसाठी देवस्थान संस्थान सज्ज झाले आहे. देशातील जगन्नाथपुरीच्या खालोखाल या रथाचा क्रमांक लागतो. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पदरी भव्य रथ आहे. आहे. त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचा रथ पेशवेकालीन सरदार रघुनाथराव विंचूरकर यांनी सन १७३७ संस्थानला प्रदान केला आहे.याशिवाय रथोत्सवासाठी निफाड तालुक्यातील विंचूर येथील शेकडो एकर जमीन देवस्थान न्यासला अर्पण केली. परिणामी वर्षातून एकदाच काढण्यात आलेला व गावातून मिरविण्यात येणारा रथोत्सव रोषणाई, आतषबाजीसह साजरा केला जातो. हा रथ अंदाजे ३१ फूट उंच असून, संपूर्ण रथाचे काम शिसवी या चिवट लाकडात करण्यात आले आहे.पूर्वी हा दोन्ही बाजूला कासरे लावून लोकांनी ओढण्याची सोय केली होती. तथापि रथ नियंत्रित करण्यात वारंवार अडथळे येऊलागले. विशेष म्हणजे रथ अत्यंत खिळखिळा झाल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सोल ट्रस्टी हनुमंत जोगळेकर यांनी सन १९६५ साली सांगली येथील कारागीर आणून त्यांनी संपूर्ण रथ आवळुन कासऱ्यांद्वारे रथ ओढण्याची पद्धत बंद करून दोन ते तीन बैलजोड्यांनी ओढण्याची पद्धत सुरू केली.दरम्यान, रथावर नवग्रहाच्या मूर्ती असून, संपूर्ण रथ देव-देवतांच्या मूर्तींनी सजलेला आहे.आकर्षक रंगसंगतीत येथील रंग कारागीर गुरु देव आहेर यांनी सदर रथ साकारला आहे.ग्रामदेवतेला गाडाभर भाताचा नैवेद्यकार्तिक पौर्णिमेला सायंकाळी रथ मिरवणूक अर्थात गावात रथोत्सव असतो. त्याच दिवशी दुपारी १२ वाजता ग्रामदेवता महादेवीला रेडा व बैल असलेल्या गाडीत भात नैवेद्याची पारंपरिक प्रथा आहे. ही प्रथा व्यवस्थापक पेंडोळे, देशमुख, महाजन, दीक्षित, मुळे, कुलकर्णी, खांडेकर, घैसास आदी ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत व मंत्रोच्चारात ग्रामदेवता मरीआई तथा महादेवीला गाडाभर भात अर्पण केला जातो, तर रेड्याच्या प्रातिनिधिक स्वरूपात मातेच्या मंदिरासमोर कोहळा कापून त्याचे तुकडे करून चारी दिशांना फेकले जातात.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरReligious programmeधार्मिक कार्यक्रम