शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅम’च्या अंतिम रेषेवर पुन्हा फडकविणार तिरंगा : १७ जूनपासून थरार

By admin | Updated: June 5, 2017 22:17 IST

अ‍ॅक्रॉस आॅफ अमेरिका (रॅम) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम रेषेवर तिरंगा फडकविण्यासाठी पुन्हा एकदा नाशिकच्या दोघा डॉक्टरांची जोडी सज्ज झाली आहे.

नाशिक : जगातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या अ‍ॅक्रॉस आॅफ अमेरिका (रॅम) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम रेषेवर तिरंगा फडकविण्यासाठी पुन्हा एकदा नाशिकच्या दोघा डॉक्टरांची जोडी सज्ज झाली आहे. ७२ तासांत अठराशेपेक्षा अधिक किलोमीटर अंतर कापून स्पर्धेच्या सहभागाच्या निकषावर खरे उतरलेले सायकलपटू डॉ. राजेंद्र नेहेते व डॉ. रमाकांत पाटील यांनी रॅम जिंकू न पुन्हा भारताचे नाव उंचविण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत व्यक्त केला.नाशिकच्या डॉक्टर महाजन बंधूंनी २०१५ साली ‘रॅम’मध्ये तिरंगा फडकविला होता. यानंतर पुन्हा नाशिकचे नेहेते, पाटील ही एक जोडी तर मुंबईचे पंकज मारलेशा आणि डॉ. संदीप शेवाळे या दुसऱ्या जोडीचा भारतीय संघात समावेश आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘रॅम’चा संकल्प त्यासाठी सुमारे सहा महिन्यांपासून सुरू असलेला सराव, स्पर्धेचे नियम, निकष आणि विविध खडतर टप्पे आदिंबाबत माहिती दिली.

यावेळी नेहेते व पाटील म्हणाले, ‘रॅम’ शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी बघणारी स्पर्धा आहे; मात्र इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर या स्पर्धेत आम्ही विजय मिळवून भारताचा तिरंगा फडकविण्याचा पूरेपूर प्रयत्न करणार आहे. वाळवंटातील ४६ अंश तपमान तर कधी बर्फाळ प्रदेशातील शून्य अंश तपमानातील परिसरातून जाणारा ‘रॅम’चा मार्ग आम्ही सर करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून कसोशीने सराव करीत आहे. स्पर्धेच्या सहभागाविषयीच्या निकषाप्रमाणे आमच्या जोडीने सुमारे १८५० किलोमीटर अंतर अवघ्या ७२ तासांत पूर्ण केल्याची माहिती पाटील यांनी दिली. सायकलपटू स्पर्धकांना रस्ता मार्गदर्शक ते आरोग्यापर्यंत सर्वच प्रकारची काळजी सहायक चमूचे बारा ते सोळा डॉक्टर मित्र घेणार आहेत. चमूचे प्रमुख डॉ. सुनील वर्तक, डॉ. चंद्रशेखर संकलेचा, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. आशुतोष ठोळे आदि यावेळी उपस्थित होते.