शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिश करण्याचा बनाव अन‌् सोनसाखळीवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:53 IST

पंचवटी : दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव करत दोघा चोरट्यांनी एका वृध्देची सुमारे सव्वालाख रुपये किमतीची ६ तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसूत्र असलेली पोत लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.१०) दुपारी एक वाजेच्या सुमारास म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरिगेशन कॉलनीसमोर मखमलाबाद शिवारात घडली आहे. याबाबत दोघा चोरट्यांविरुध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवृध्देची फसवणूक : सव्वा लाख रुपयांचे मंगळसूत्र लांबविले

पंचवटी : दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव करत दोघा चोरट्यांनी एका वृध्देची सुमारे सव्वालाख रुपये किमतीची ६ तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसूत्र असलेली पोत लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.१०) दुपारी एक वाजेच्या सुमारास म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरिगेशन कॉलनीसमोर मखमलाबाद शिवारात घडली आहे. याबाबत दोघा चोरट्यांविरुध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वामी समर्थ सोसायटी कल्पतरू रो बंगलो येथे राहणाऱ्या कल्पना बाळासाहेब थोरात (६३) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दुपारी एक वाजेच्या सुमारास २० ते २५ वयोगटातील पांढरा व लव्हेंडर रंगाचा शर्ट परिधान केलेले दोघे संशयित थोरात यांच्या घरी आले व त्यांनी आम्ही सोन्याचांदीचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी थोरात यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोन्याची पोत पॉलिश करून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून काढून घेतली व हातचलाखी करून थोरात यांची नजर चुकवून सव्वालाख रुपये किमतीची सोन्याची पोत घेऊन पल्सरसारख्या दुचाकीने धूम ठोकली.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस मिळालेल्या वर्णनावरून चोरट्यांचा उशिरापर्यंत शोध घेत होते; मात्र संशयित पोलिसांना आढळून आले नाहीत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी