शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकला दुचाकीची धडक; दोन जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:33 IST

उड्डाणपुलावरील उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या भीषण अपघातात कॅनडा कॉर्नर व दिंडोरी रोडवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि़२८) पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावरील औरंगाबाद नाका परिसरात घडली़ आकाश रामदास काखे (२५, राहणार किशोरचंद्र हौसिंग सोसायटी, कॅनडा कॉर्नर, नाशिक) व त्याचा मित्र रोशन ऊर्फ तन्मय जगन्नाथ ओझरकर (रा़ वेदश्री रो-हाउस, आकाश पेट्रोलपंपाजवळ, दिंडोरीरोड) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत़

नाशिक : उड्डाणपुलावरील उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या भीषण अपघातात कॅनडा कॉर्नर व दिंडोरी रोडवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि़२८) पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावरील औरंगाबाद नाका परिसरात घडली़ आकाश रामदास काखे (२५, राहणार किशोरचंद्र हौसिंग सोसायटी, कॅनडा कॉर्नर, नाशिक) व त्याचा मित्र रोशन ऊर्फ तन्मय जगन्नाथ ओझरकर (रा़ वेदश्री रो-हाउस, आकाश पेट्रोलपंपाजवळ, दिंडोरीरोड) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत़  पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आकाश व रोशन हे पल्सर दुचाकीने (एमएच १५, डीएक्स ८४७२) द्वारका उड्डाणपुलावरून आडगावकडे जात होते़ औरंगाबाद नाका परिसरातील उड्डाणपुलावरील पोल क्रमांक २१ च्या दरम्यान तांत्रिक बिघाड झालेला मालवाहू ट्रक (सीजी ०४, जेसी ७५१४) उभा होता़ भरधाव जाणाºया आकाश व रोशन यांना उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी ट्रकला पाठीमागून जाऊन आदळली़ हा अपघात इतका गंभीर होता की या दोघांचा जागीच मृत्यू झाला़या अपघाताची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली़ या दोघांनाही पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्यांचा अपघातानंतर लगेच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले़दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAccidentअपघात