येवला : शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल संचलित भारम न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपसरपंच रमा आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ध्वज व स्वच्छतेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून कर्मवीर, शूरवीर कोविड योद्ध्यांना विद्यालयाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मायावती पगारे, भारम ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. हितेंद्र गायकवाड, उपअधीक्षक डॉ. सुशांत पाटील तसेच सरपंच सुरेखा जेजूरकर, ज्येष्ठ नागरिक श्याम देशमुख, बाळा जेजूरकर, राजू गांजे, माजी सैनिक बाबुराव सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याध्यापक हरिश्चंद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक एम. व्ही. आवारे यांनी,तर सूत्रसंचालन डी. बी. नागरे, गणेश डोंगरे यांनी केले. फलकलेखन कलाशिक्षक एस. यू. गाडेकर यांनी केले. गोकुळ जेजूरकर यांनी आभार मानले.