शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींनी हक्कासाठी एकत्रित यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:27 IST

आदिवासी बांधव आपल्या हक्कासाठी एकत्रित आला पाहिजे आणि खऱ्या मत्स्यव्यवसाय करणाºया बांधवांना मत्स्यमार संस्था मिळाल्या पाहिजे. आदिवासी हा नेहमी जमीन, जंगल, पाणी यांचे संरक्षण करणार आहे. तो निसर्ग पूरक असल्याने आदिवासी हक्क त्याला मिळाला पाहिजे. आमच्या आयुक्त कार्यालयाची दारे आपल्यासाठी कधीही उघडी आहे.

येवला : आदिवासी बांधव आपल्या हक्कासाठी एकत्रित आला पाहिजे आणि खऱ्या मत्स्यव्यवसाय करणाºया बांधवांना मत्स्यमार संस्था मिळाल्या पाहिजे. आदिवासी हा नेहमी जमीन, जंगल, पाणी यांचे संरक्षण करणार आहे. तो निसर्ग पूरक असल्याने आदिवासी हक्क त्याला मिळाला पाहिजे. आमच्या आयुक्त कार्यालयाची दारे आपल्यासाठी कधीही उघडी आहे. आपला हक्क मिळवून देण्यासाठी व आपल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील, असे आश्वासनही प्रादेशिक उपआयुक्त एस. व्ही. साळुंके यांनी दिले. तालुक्यात प्रथमच खिर्डीसाठे येथे मत्स्यमारांसाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून साळुंके बोलत होत्या.एकलव्य प्राथमिक भूजलाशयातील मत्स्यमार व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित खिर्डीसाठे संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवळे होते. येथे मत्स्यसंस्था स्थापन झाल्यामुळे येथील आदिवासी बांधवांना खºया अर्थाने न्याय मिळाला असल्याचे पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड म्हणाले.  आम्ही आदिवासी बांधव देशात फक्त लेबर उपलब्ध करण्याचे काम करत आहोत. आमचा पंजा ऊस तोडणार, ही चिंता ढवळे यांनी व्यक्त करून महाराष्ट्रातील ८० टक्के मत्स्यमार सोसायट्या या इतर समाजाच्या ताब्यात आहेत. सगळी धरणे मासेमारी करण्यासाठी मिळाली तर आदिवासी बांधवांच्या राहणीमानात, शिक्षण, सामाजिक, आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होईल, असेही शिवाजीराव ढवळे म्हणाले. कार्यक्रमास राजेंद्र पिंपळे, शांताराम पवार, अरुण माळी,विलास खुरसणे, खंडू बहिरम आदींसह महिला, ग्रामस्थ व आयुक्तालयातील कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव सोनवणे यांनी केले. विजय माळी, अनिता माळी यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक