शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:18 IST

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या एका आदिवासी वाडीला गेल्या दहा वर्षांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तसेच या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त झालेल्या महिलांनी खंबाळे ते इगतपुरी पंचायत समिती असा बारा किलोमीटर अंतराचा पायी हंडामोर्चा काढला. हा मोर्चा आरंभी इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर नेण्यात आला व नंतर पंचायत समितीवर धडकला.

ठळक मुद्देदोन तास ठिय्या : पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संताप

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या एका आदिवासी वाडीला गेल्या दहा वर्षांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तसेच या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त झालेल्या महिलांनी खंबाळे ते इगतपुरी पंचायत समिती असा बारा किलोमीटर अंतराचा पायी हंडामोर्चा काढला. हा मोर्चा आरंभी इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर नेण्यात आला व नंतर पंचायत समितीवर धडकला.तालुक्यातील महामार्गावर असलेल्या खंबाळे गावाच्या आदिवासी वस्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने या वाडीतील महिलांना पिण्याचे पाणी जवळच्या नदीपात्रातून आणावे लागते. या वाडीला पिण्याचे पाणी मिळावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी अनेकदा करूनही दखल घेतली नसल्याने या वाडीतील महिला संतप्त झाल्या होत्या. सकाळी या महिलांनी संघटित होत डोक्यावर रिकामे हंडे घेत रखरखत्या उन्हात तब्बल बारा किलोमीटर अंतर पायपीट करीत खंबाळे ते इगतपुरी असा मोर्चा काढला.हा मोर्चा इगतपुरी तहसील कार्यालयात आणण्यात आला मात्र सदर बाब पंचायत समितीच्या अखत्यारित असल्याचे समजल्याने या महिलांनी आपला मोर्चा पंचायत समितीकडे वळविला. हा मोर्चा पंचायत समितीत दाखल झाल्यानंतर संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी किरण जाधव यांच्या दालनात प्रवेश करून गटविकास अधिकाºयांना जाब विचारला; मात्र या बाबीकडे गटविकास अधिकाºयाने गांभीर्याने न घेता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी गटविकास अधिकाºयांच्या दालनात ठिय्या मांडला. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा आक्र मक पवित्रा घेतल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, या मोर्चेकरू महिलांनी दूषित पाणी आणून गटविकास अधिकाºयांकडे दिले. ग्रामसेवकाची तत्काळ बदली करावी, पिण्यास पाणी मिळावे अशी मागणी लावून धरली.अखेर श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे, तालुका महिला उपाध्यक्ष नीता गावंडा, शांताराम भगत आदींनी मध्यस्थी करीत मोर्चेकºयांची भूमिका पंचायत समिती प्रशासनाकडे मांडली. पंचायत समितीने सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.—————————————————————

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWomenमहिला