शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ताहाराबादच्या आदिवासींचा पंचायत समितीवर हल्लाबोल

By admin | Updated: March 7, 2017 00:34 IST

सटाणा : घरकुल अनुदान रखडल्याने पाच ते सहा वर्षांपासून उघड्यावर संसार असलेल्या बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील संतप्त आदिवासी बांधवांनी येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला.

 सटाणा : घरकुल अनुदान रखडल्याने अक्षरश: गेल्या पाच ते सहा वर्षांपासून उघड्यावर संसार असलेल्या बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील संतप्त दीडशेहून अधिक आदिवासी बांधवांनी आज सोमवारी येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला. अचानक केलेल्या हल्लाबोलमुळे प्रशासनाची धावपळ उडाली.ताहाराबाद ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या रावेर आदिवासी वस्तीत गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी १६३ घरकुल मंजूर करण्यात आले होते. घरे मंजूर झालेल्या आदिवासी बांधवांनी नव्या बांधकामासाठी जुन्या घरांची बांधकामे पाडली. त्यामुळे त्यांचा संसार पूर्णपणे उघड्यावर आहे. वेळोवेळी अनुदानासाठी पाठपुरावा केल्यानंतर पहिला हप्ता मिळाला. मात्र त्यानंतर अनुदान रखडल्याने गेल्या काही वर्षांपासून उघड्यावर संसार पडला आहे. निवारा नसल्यामुळे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण नाही. अनुदानासाठी अनेकवेळा ग्रामसेवकाकडे पाठपुरावा केला; मात्र उडवाउडवीच्या उत्तराशिवाय काही हाती न आल्याने संतप्त झालेल्या शंभर ते दीडशे आदिवासी बांधवांनी आज सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी संतप्त आदिवासी बांधवांनी गोंधळ घातल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. संतप्त आदिवासींचा जमाव पाहून कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार, ताहाराबादच्या सरपंच रत्ना सोनवणे, उपसरपंच प्रदीप कांकरिया, सीताराम साळवे यांनी जमावाला शांत करून मध्यस्थीची भूमिका घेतली. पंचायत समिती सभागृहात ग्रामविस्तार अधिकारी व्ही.पी. जाधव, रामकृष्ण खैरनार, घरकुलचे नितीन पाटील, ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांना पाचारण करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या नियमानुसार जे घरकुल मंजूर आहेत. आणि अनुदान हप्ता प्राप्त करण्यासाठी ज्या अटी-शर्ती लागू आहेत. त्यापूर्ण असतील अशा लाभार्थींना मार्चअखेर त्या टप्प्यातील अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांनतर आदिवासी बांधवांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात महेश साळवे, दत्तू सोनवणे, रतन सोनवणे, शांताराम माळी, हरिश्चंद्र सोनवणे, केवळ मोरे, लक्ष्मण सोनवणे, भिवसन सोनवणे, शांताराम सोनवणे, रवींद्र माळी, गोटू सोनवणे, पिंटू अहिरे, हिरामण बाळू, कौतिक मोरे, धर्मा माळी, अंकुश सूर्यवंशी, विनोद सोनवणे यांच्यासह लाभार्थी आदिवासी बांधव सहभागी झाले होते. (वार्ताहर)