नाशिक : आदिवासी विकास विभागातील शिक्षक व शिक्षकेतर वर्ग-३ संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा, पुणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (स्त्री), गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री), उपलेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, लघुटंकलेखक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक या पदांच्या लेखी परीक्षा दि. २९ जून रोजी होणार आहेत. परीक्षेबाबतच्या सूचना व माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे, असे अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक विभाग यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
‘आदिवासी विकास’च्या लेखी परीक्षा २९ रोजी
By admin | Updated: June 7, 2014 01:47 IST