शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास विभागात कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:50 IST

नाशिक : आदिवासी विकास आयुक्तालयाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या तत्कालीन प्रकल्प अधिकाºयाने शासकीय योजनेतील लाभार्थींच्या नावे असलेली पाइपांची रक्कम परस्पर घेऊन तीन वर्षांच्या कालावधीत शासनाची एक कोटी चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी नाशकातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात कैलास परशराम मोते (तत्कालीन प्रकल्प अधिकारी तथा वरिष्ठ अधिकारी कृषी विभाग) यांच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़

ठळक मुद्देप्रकल्प अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा; लाभार्थींची रक्कम परस्पर काढली

नाशिक : आदिवासी विकास आयुक्तालयाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या तत्कालीन प्रकल्प अधिकाºयाने शासकीय योजनेतील लाभार्थींच्या नावे असलेली पाइपांची रक्कम परस्पर घेऊन तीन वर्षांच्या कालावधीत शासनाची एक कोटी चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी नाशकातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात कैलास परशराम मोते (तत्कालीन प्रकल्प अधिकारी तथा वरिष्ठ अधिकारी कृषी विभाग) यांच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़सद्यस्थितीत कृषी विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले कैलास मोते याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कुठे कुठे फसवणूक व अपहार केला त्याची माहिती मिळणार आहे़ राज्यातील लाखो आदिवासी कुटुंबासाठी विविध शासकीय योजना राबविण्याचे काम आदिवासी आयुक्तालय करते़ यासाठी या विभागाला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो़ मात्र अधिकारीच लाभार्थींच्या रकमेचा अपहार करीत असतील तर खºया लाभार्थींना योजनांचा लाभ कसा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे़प्रमोद पाटील (काठेगल्ली, द्वारका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक अंतर्गत असलेल्या एकात्मिक आदिवासी कार्यालयात१ जानेवारी २००५ ते ३१ डिसेंबर २००८ या कालावधित प्रकल्प अधिकारी म्हणून कैलास मोते कर्तव्यावर होते़ या कालावधित मोते यांनी आकाशदीप सोसायटीच्या संगनमताने शासनाच्या लघुउपसा जलसिंचन योजनेच्या लाभार्थींकरिता पाइपांची खरेदी करून ९२ लाभार्थींसाठी असलेल्या एकूण २,५७६ पाइपांच्या १३ लाख ६५ हजार २८० रुपयांच्या रकमेचा अपहार केला.तत्कालीन प्रकल्प अधिकारी मोतेयाने २००५ ते २००८ या कालावधीततब्बल ७००हून अधिक लाभार्थींच्या हजारो पाइपांची खरेदी करूनवेळोवेळी लाखो रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार करून फसवणूक केली. आतापर्यंत एक कोटी चार लाख६४ हजार ७८० रुपयांपर्यंतचीशासनाची फसवणूक झाल्याचे फिर्यादित म्हटले आहे़

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक