व्यासपीठावर वावीचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, बाजार समितीचे उपसभापती संजय खैरनार, सरपंच मनीषा खैरनार, प्रमुख व्याख्याते देवराम खेताडे, आदिवासी समाजाचे नेते तुकाराम मेंगाळ, सह्याद्री आदिवासी ठाकर समाजोन्नती मंडळाचे तालुकाध्यक्ष अजय कडाळे, संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष संदीप शेळके, बोरखिंडचे सरपंच गणेश कर्मे आदी उपस्थित होते.
वेगवेगळ्या जातींमध्ये विखुरलेला आदिवासी समाज अज्ञानामुळे अप्रगत आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यातून त्यांची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधणे आवश्यक आहे. तालुक्यातील आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आमदार माणिक कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही सिमंतिनी कोकाटे यांनी आपल्या भाषणात दिली. देवराम खेताडे यांनी आदिवासी क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती दिली.
शासनदरबारी आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व समाजाने एका छताखाली एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन तुकाराम मेंगाळ यांनी केले. मेंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री आदिवासी ठाकर समाजोन्नती मंडळ, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, एकलव्य संघटना, बिरसा ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजिला होता.
सूत्रसंचालन सोमनाथ पथवे यांनी केले. यावेळी प्रल्हाद उघडे, अर्जुन जाधव, भारत उघडे, संजय उघडे, उषा जाधव, एकनाथ पथवे, लक्ष्मण गिरे, विनायक आगिवले, भाऊपाटील आगिवले, सोमनाथ पथवे, आनंदा जाधव आदींसह परिसरातील गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व आदिवासी बांधव उपस्थित होते.
(१२ चास)
सिन्नर तालुक्यातील चास येथील कमळूचीवाडी येथे आदिवासी दिन प्रसंगी सिमंतिनी कोकाटे, संजय खैरनार, सागर कोते, प्रवीण अंढागळे, देवराम खेताडे, मनीषा खैरनार, प्रयागा जाधव, चंद्रशेखर खैरनार, तुकाराम मेंगाळ, सुरेश कुचेकर, संदीप शेळके आदी उपस्थित होतेण
120821\12nsk_10_12082021_13.jpg
सिन्नर तालुक्यातील चास येथे कमळूचीवाडी येथे आदिवासी दिन प्रसंगी सीमंतिनी कोकाटे, संजय खैरनार, सागर कोते, प्रवीण अंढागळे, देवराम खेताडे, मनीषा खैरनार, प्रयागा जाधव, चंद्रशेखर खैरनार, तुकाराम मेंगाळ, सुरेश कुचेकर, संदीप शेळके आदी