शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 21:27 IST

सटाणा : कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची नितांत गरज असून, एकलव्याने अंगठा दिला होता, आजच्या काळात अंगठ्याची जपवणूक करण्याची गरज आहे. आपली संस्कृती जोपासून सर्वच क्षेत्रांत आदिवासी समाजातील तरुणांनी प्रगती साधली पाहिजे आणि राजकारणात सर्वच ठिकाणी चांगल्या सुसंस्कृत प्रतिनिधींना पाठविण्यासाठी एकजुटीने राहिले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक मातापित्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन कलियुगातला एकलव्य तयार केला पाहिजे, असे मत आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदिलीप बोरसे : आदिवासी एकता परिषदेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

सटाणा : कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची नितांत गरज असून, एकलव्याने अंगठा दिला होता, आजच्या काळात अंगठ्याची जपवणूक करण्याची गरज आहे. आपली संस्कृती जोपासून सर्वच क्षेत्रांत आदिवासी समाजातील तरुणांनी प्रगती साधली पाहिजे आणि राजकारणात सर्वच ठिकाणी चांगल्या सुसंस्कृत प्रतिनिधींना पाठविण्यासाठी एकजुटीने राहिले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक मातापित्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन कलियुगातला एकलव्य तयार केला पाहिजे, असे मत आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केले.येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एकता परिषदेचे संस्थापक सचिव डोंगर बागुल होते. आदिवासी समाजाने व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता सरकारी दवाखान्याचा आधार घेणे आज काळाची गरज असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रेखा पवार यांनी सांगितले. आदिवासी समाजाचा खरा इतिहास आजपर्यंत पुढे न आल्यामुळेच खरा इतिहास काय आहे ते समजले नाही. त्यासाठी प्रत्येकाने आदिवासींचा इतिहास समजून घेण्याची गरज असल्याचे अध्यक्षस्थानावरून बोलताना बागुल म्हणाले.या वेळी महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख सुनील गायकवाड, युवा राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमचंद सोनवणे, जिल्हा सचिव राजेंद्र माळी, केंद्रीय आंदोलन समितीचे सदस्य कैलास पवार यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वितेसाठी एकता युवा जिल्हाध्यक्ष साहेबराव आहिरे, तालुकाध्यक्ष सुरेश जाधव, शहराध्यक्ष बाळासाहेब बागुल, उपशहराध्यक्ष सचिन पवार, उपतालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, नंदू शिंदे, रवि पवार, अनिता माळी यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :MLAआमदारRural Developmentग्रामीण विकास