शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

आदिवासी भागालास्ट्रॉबेरी ने दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 15:03 IST

दिंडोरी तालुका : वणी-सापुतरा रस्त्यावर थाटली दुकाने लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही भागातील पिके, फळे, रानभाज्या इ.संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे आकर्षण बनल्या आहे. त्यामध्ये रस्त्याच्या कडेला छोट्या दुकानातील स्ट्रॉबेरी आता येणाऱ्या प्रत्येकांचे लक्ष वेधून घेत असुन खरेदीचा मोह सुटत आहे.

ठळक मुद्देया पिकांला चांगला बहर येत आहे.

दिंडोरी तालुका : वणी-सापुतरा रस्त्यावर थाटली दुकाने लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही भागातील पिके, फळे, रानभाज्या इ.संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे आकर्षण बनल्या आहे. त्यामध्ये रस्त्याच्या कडेला छोट्या दुकानातील स्ट्रॉबेरी आता येणाऱ्या प्रत्येकांचे लक्ष वेधून घेत असुन खरेदीचा मोह सुटत आहे.तालुक्यातील काही भागात थंडीच्या हंगामात स्ट्रॉबेरीचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने या पिकांला चांगला बहर येत आहे.लाल, गुलाबी रंगाची, गोड आंबट चवीची छोट्या कागदांच्या खोक्यामधील स्ट्रॉबेरी पाहिल्यावर प्रत्येकांच्या तोंडाला पाणी सुटते. थंडीच्या दिवसात आरोग्यदायी असणारी स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असते. सध्या थंडीचा हंगाम असल्याने या पिकांला चांगला बहर आला असुन आदिवासी भागातील शेतकरी बांधवांना मोठा आधार मिळत आहे.काही शेतकरी मोठ्या घाऊक व्यापारी वर्गाला माल देतात .तर काही मुंबई, गुजरात व महाराष्ट्रातील विविध भागात हा माल विक्रीसाठी पाठवितात. परंतु काहींनी तात्काळ नगदी पैसा उपलब्ध व्हावा यासाठी वणी, सापुतरा, विविध धार्मिक स्थळे या ठिकाणी छोटी दुकाने थाटुन स्ट्रॉबेरी विक्रीसाठी ठेवतात. या विक्रीतून परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांना चांगल्यापैकी अर्थार्जन होऊ लागले आहे.                   नाशिक जिल्ह्यातील पेठ, कळवण, सुरगाणा इ. घाटमाथ्यावरील लाल मातीत पिकणारी लालभडक आंबट गोड स्ट्रॉबेरी फळे वणी, सापुतारा, सप्तशृंगी गड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दिसत असल्यामुळे प्रत्येक प्रवासी, भाविक, पर्यटक यांचे मन आकर्षण करून खरेदी करतानांचे चित्र सध्या दिसत आहे.                               स्ट्रॉबेरी हे पिक साधारणपणे कळवण, सुरगाणा, पेठ भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कारण या भागातील जमिनीतील माती ही लाल स्वरूपांची असल्याने ती या पिकांच्या पोषकांला महत्त्वाची मानली जाते.व पिकंही जोमाने येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग आपल्या शेतात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी पिके घेऊ लागला आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी पिकांचे क्षेत्र वाढु लागले आहे. या पिकांकडे आता या भागातील शेतकरी वर्ग नगदी भांडवल मिळुन देणारे पिक म्हणून पाहु लागला आहे.त्यामुळे हे पिके आता तालुक्यातील आदिवासी शेतकरी वर्गाँला आधार देऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.

हिवाळ्यात उपयुक्त स्ट्रॉबेरीस्ट्रॉबेरी हे फळ थंडीत येणारे फळ म्हणून ओळखले जाते. साधारण पणे डिंसेबर, जानेवारीमध्ये या फळांला जास्त बहर येत असतो. हे आरोग्यदायी असल्याने ते खाल्ले तर त्वचा रोग दुर होतो. व शरीरात रक्त वाढण्यासाठी मदत होते. असे हे फळ पिकविणारे शेतकरी सांगतात. (२७ लखमापूर)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी