शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

नाशिक शहरातील वृक्षसंपदा ४८ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 17:12 IST

वृक्षगणना : लष्करी हद्दीतील मोजणी प्रलंबित

ठळक मुद्देसुमारे २७० प्रजाती निदर्शनास आल्याची माहिती लष्करी हद्दीतील गांधीनगर विमानतळ परिसरातील वृक्षगणनेला अद्याप परवानगी मिळू शकलेली नाही

नाशिक - नाशिक शहर खऱ्या अर्थाने हरित असल्याचे महापालिकेमार्फत सुरू असलेल्या वृक्षगणनेतून समोर आले आहे. खासगी एजन्सीमार्फत गेल्या पंधरा महिन्यांपासून सुरू असलेल्या वृक्षगणनेत आतापर्यंत ४७ लाख ९२ हजार ७६६ वृक्षसंपदा आढळून आली असून त्यात सुमारे २७० प्रजाती निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सिंहस्थ कुंभमेळा काळात रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणा-या वृक्षतोडीचा मुद्दा समोर आला त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी त्यास जोरदार हरकत घेतल्याने प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने वृक्षतोडीला काही अटीशर्तींवर परवानगी दिली परंतु, महापालिकेला शहरातील वृक्षांची गणना करण्याचेही आदेशित केले. त्यानुसार, डिसेंबर २०१६ मध्ये अभिषेक कृष्ण यांच्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीत एका खासगी एजन्सीला वृक्षगणनेचे काम देण्यात आले. यापूर्वी सन २००७ मध्ये वृक्षगणना करण्यात आली होती. त्यावेळी सुमारे १८ लाख वृक्षसंपदा आढळून आली होती. आता नाशिक शहराची लोकसंख्या १८ लाखांवर जाऊन पोहोचली असता, शहरात वृक्षसंपदा तब्बल ४८ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. एजन्सीमार्फत शहरात ३ मीटरच्यावर वाढलेल्या वृक्षांची गणना केली जात असून आतापावेतो ४७ लाख ९२ हजार ७६६ वृक्ष आढळून आले आहेत. शहरातील जवळपास सर्व प्रभागांमधील गणना पूर्ण झाली आहे. मात्र, लष्करी हद्दीतील गांधीनगर विमानतळ परिसरातील वृक्षगणनेला अद्याप परवानगी मिळू शकलेली नाही. लष्कराकडून सदर परवानगी मिळविण्याचे प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहेत. लष्करी हद्दीत फोटोग्राफीस मनाई आहे. परंतु,वृक्षगणनेत फोटोग्राफी हा महत्वाचा घटक असल्याने त्या मुद्यावर परवानगीचे घोडे अडले आहे. गांधीनगर विमानतळ परिसरात सुमारे २० ते २२ हजार झाडे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, वृक्षसंपदा ४८ लाखांच्यावर जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका