शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

आरोग्य, नैरोबी विद्यापीठ यांच्यात करार

By admin | Updated: December 9, 2015 00:14 IST

आरोग्य, नैरोबी विद्यापीठ यांच्यात करार

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कॉलेज आॅफ हेल्थ सायन्सेस नैरोबी विद्यापीठ आणि मर्क सेरोनो, मिडल ईस्ट, दुबई यांच्या संयुक्तमाने ‘मआविवि - मर्क आफ्रिका इंटरनॅशनल फेलोशिप प्रोग्राम इन मेडिकल आॅकोलॉजी’ अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे दुबई येथील मर्क सेरोनो मल्टीनॅशनल कंपनीच्या चीफ सोशल आॅफिसर राशा केलेज यांनी सांगितले.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आयोजित कार्यक्रमात त्यांनी याबाबतची घोषणा केली. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर, प्रतिकुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव डॉ. काशीनाथ गर्कळ, युनिव्हर्सिटी आॅफ नैरोबीचे प्राचार्य प्रा. अ‍ॅझॅक किब्वेज, नैरोबीचे प्राध्यापक निकोलस अभिन्या, बिजिनेस रिस्पॉन्सबिलीटी अ‍ॅण्ड मार्केट डेव्हलपमेंट आॅफ्रिकेचे संचालक लिओनार्द सायका, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट, टोपीवाला नॅशनल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भरमाल आदि उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कॉलेज आॅफ हेल्थ सायन्सेस नैरोबी विद्यापीठ आणि मर्क सेरोनो, मिडल ईस्ट, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मआविवि-मर्क आफ्रिका इंटरनॅशनल फेलोशिप प्रोग्राम इन मेडिकल आॅकोलॉजी’ अभ्यासक्रम सुरू करणेसाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. काशीनाथ गर्कळ, मर्कच्या चीफ सोशल आॅफिसर राशा केलेज व युनिव्हर्सिटी आॅफ नैरोबीचे प्राचार्य प्रा. अ‍ॅझॅक किब्वेज यांनी स्वाक्षरी केली.याप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी सांगितले की, अभ्यासक्रमासाठी दहा सेंटर्सची नियुक्ती केली जाणार आहे. प्रत्येक सेंटरमध्ये दोन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. पहिले सहा महिने हे विद्यार्थी भारतातील केंद्रांमध्ये निरीक्षकाच्या भूमिकेत राहतील व अध्ययन करतील. ही सर्व दहाही केंद्रे माहिती तंत्रज्ञानाने जोडली जाणार असून, अत्याधुनिक अशा वेबेक्स सिस्टीमचा उपयोग यात केला जाणार आहे. या प्रणालीद्वारे वैद्यकीय विद्यार्थ्यांना विविध रुग्णांच्या उपचार पद्धतीबाबत चर्चा करता येऊ शकेल. त्यानंतरची पुढील सहा महिने नैरोबी येथे हे विद्यार्थी परतणार असून, तेथील महाविद्यालयात अभ्यासक्रम करतील. (प्रतिनिधी)