शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

दुर्लक्षितांच्या वेदनांवर उपचारांची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:57 IST

डॉक्टर-रुग्ण यांच्या नातेसंबंधाबाबत वारंवार चर्चा होते. सकारात्मक-नकारात्मक असे या चर्चेचे पैलू असतात. बहुतांश डॉक्टर आपल्या व्यवसायाची पायरी ओलांडून सामाजिक संवेदनांच्या जाणिवेतून दुर्लक्षित घटकांमधील रुग्णांपर्यंत पोहचून त्यांच्या वेदनांवर फुंकर घालतात आणि आरोग्यसेवेचे व्रत जोपासण्याचा प्रयत्न करतात. यामुळे डॉक्टर-रुग्ण यांच्यामधील नात्याची वीण घट्ट होण्यास निश्चितच मदत होत आहे.

नाशिक : डॉक्टर-रुग्ण यांच्या नातेसंबंधाबाबत वारंवार चर्चा होते. सकारात्मक-नकारात्मक असे या चर्चेचे पैलू असतात. बहुतांश डॉक्टर आपल्या व्यवसायाची पायरी ओलांडून सामाजिक संवेदनांच्या जाणिवेतून दुर्लक्षित घटकांमधील रुग्णांपर्यंत पोहचून त्यांच्या वेदनांवर फुंकर घालतात आणि आरोग्यसेवेचे व्रत जोपासण्याचा प्रयत्न करतात. यामुळे डॉक्टर-रुग्ण यांच्यामधील नात्याची वीण घट्ट होण्यास निश्चितच मदत होत आहे.  शहरातील डॉक्टरांची मुख्य संघटना आयएमए असो किंवा या संघटनेचे काही सदस्य असो तसेच बालरोगतज्ज्ञ अथवा नेत्र, दंतरोग तज्ज्ञदेखील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये महिला, मुले, पुरुषांसह ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर आजारांचे निदान करत मोफत वैद्यकीय सेवा पुरविताना दिसून येतात. कुपोषणाची मोठी गंभीर समस्या आदिवासी भागातील मुलांमध्ये वाढीस लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपले सामाजिक कर्तव्य म्हणून शहरातील सोशल नेटवर्किंग फोरमच्या पुढाकाराने बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेचे १६ डॉक्टरांनी कुपोषित मुलांसाठी तीन महिने विशेष मोहीम हाती घेतली होती.या मोहिमेसाठी आयएमए तसेच केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनकडूनही मदत लाभली. एकूण ३५३ बालकांची या मोहिमेअंतर्गत बालरोग तज्ज्ञांनी तपासणी करुन योग्य आहार, औषधोपचार तीन महिन्यांसाठी पुरविण्यात आला. यावेळी दंड घेर, डोक्याचा घेर या परिमाणांऐवजी बालकांचे वजन वाढविण्याच्या निकषावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला.  तसेच रोटरी इनरव्हील क्लब जेननेक्स्टच्या माध्यमातून शहरातील गरजू व विशेष मुलांच्या शाळांना भेट देत त्यांच्या मौखिक आरोग्याची तपासणी व दंतव्यंग तपासणी निदान उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत शहरातील २२ शाळांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांची डॉ. मीनल पलोड यांच्यामार्फत मोफत दंत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, ७५ मुलांना पलोड यांनी त्यांच्या दवाखान्यातून मोफत औषधोपचार उपलब्ध क रून दिला.आदिवासी भागासाठी कल्पतरूचे ‘व्हिजन’शहरामधील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद पाटील यांनी २००० साली कल्पतरू फाउण्डेशनची स्थापना के ली. त्यामाध्यमातून आदिवासी तालुक्यातील गाव, वाडे-वस्तीवर जाऊन तेथील लोकांच्या डोळ्यांची तपासणीला प्रारंभ केला. काही वर्षांपूर्वी पिंपळगाव बसवंत, अभोणा व गुजरातमधील डांग जिल्ह्यातही या फाउण्डेशनकडून व्हिजन केंद्र सुरू करण्यात आले. या फाउण्डेशनच्या माध्यमातून आदिवासींच्या नेत्ररोग निवारणाचा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे.आरोग्य जागृतीचे ‘जगदिशा’चे व्रतडॉ. जगदीश कुलकर्णी मेमोरियल जगदिशा फाउण्डेशनच्या वतीने किशोरावस्थेतील मुलांमध्ये तसेच त्यांच्या पालकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न मागील १८ वर्षांपासून केला जात आहे. व्यसनाधिनता व दुष्परिणामांसह स्तनपानाबाबतचे चुकीचे गैरसमज व पद्धती अशा विविध विषयांवर डॉ. शामा कुलकर्णी व त्यांचे चिरंजीव डॉ. केयूर कुलकर्णी मोफत कार्यशाळांची मोहीम यशस्वीपणे राबवित आहे. दिवंगत दंतरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश कुलकर्णी यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत फाउण्डेशन जनसामान्यांमध्ये आरोग्यविषयक ज्ञानाचा प्रसार करत आहे. आतापर्यंत संस्थेच्या वतीने दीड हजाराहूंन अधिक मोफत ‘पालक शाळे’चे वर्ग भरविण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टर