शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फिरत्या दवाखान्यांमार्फत २ हजार ७४३ रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:57 IST

नाशिक : कोरोना महामारीमुळे वैद्यकीय यंत्रणा व डॉक्टर, नर्स यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवरील निर्माण झालेला ताण कमी करण्यासाठी नाशिकमध्ये भारतीय जैन संघटनेने तीन वाहनांच्या माध्यमातून फिरत्या दवाखान्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २ हजार ७४३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

नाशिक : कोरोना महामारीमुळे वैद्यकीय यंत्रणा व डॉक्टर, नर्स यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवरील निर्माण झालेला ताण कमी करण्यासाठी नाशिकमध्ये भारतीय जैन संघटनेने तीन वाहनांच्या माध्यमातून फिरत्या दवाखान्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २ हजार ७४३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. भारतीय जैन संघटनेच्या ‘डॉक्टर आपल्या दारी’ या उपक्रमामुळे नाशिक परिसरातील आरोग्य सुविधांवर येणारा ताण कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.महाराष्ट्रात आतापर्यंत हजाराहून अधिक कोविड-१९ कोरोनाची प्रकरणे समोर आली असून, सर्वाधिक संसर्गग्रस्त म्हणून राज्य अग्रक्रमावर आहे. दरदिवशी पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने सध्या राज्यातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत असताना या समस्येच्या निराकरणासाठी नाशिकमध्ये भारतीय जैन संघटनेने महाराष्ट्रात ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, तीन वाहनांमधून डॉक्टर, मदतनीस, औषधांनी सुसज्ज फिरत्या दवाखान्यांची सोय करून दिली आहे. पूर्व-सूचित वेळापत्रकानुसार हे फिरते दवाखाने नाशिक परिसरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत भागांत रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देत असून आत्तापर्यंत २ हजार ७४३ रुग्णांवर या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहे. या व्हॅनमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय मदतनीसांची संपूर्ण टीम सुसज्जित असून, कोविड-१९ ची लक्षणे रुग्णांमध्ये तपासण्यात येतात. ज्या रुग्णांमध्ये थेट संसर्ग आढळून येतो, त्यांना नियुक्त करण्यात आलेल्या रुग्णालयात पाठवले जाते. डॉक्टरांनी लिहून दिलेली किंवा उपलब्ध करून देण्यात येणारी सर्व औषधे मोफत पुरवली जात आहेत.-----भारतीय जैन संघटनेचा उपक्रमदरदिवशी मोबाइल युनिट्समध्ये अडीच हजार लोकांची तपासणी करण्यात येते आणि दिवसाला जवळपास पाचशे रुग्णांमध्ये लक्षणांची चाचपणी केली जाते. व्हॅनमधील डॉक्टर रुग्णांची ताप, सर्दी, खोकल्याची तपासणी करतात आणि त्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याविषयी सांगतात. याप्रमाणे मागील २० दिवसांत २ हजार ७४३ हून अधिक रहिवाशांची तपासणी करण्यात आली असून, ९ हून जास्त कोविड-१९ संशयित रुग्णांना सरकारी रुग्णालयांत पाठविण्यात आले आहे. कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही सेवा सुरू राहणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेने दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक