शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हरिहर गडावर ट्रेकर्सचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:45 IST

‘ट्रेकिंग’च्या नावाखाली मद्यप्राशनाची हौस भागविण्यासाठी गड-किल्ल्यांची निवड करणाºयांची वाढती संख्या निसर्गासाठी हानीकारक ठरत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक हरिहर गडावर अशाच एका मद्यपी ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने रानगवताला आग लावत धुडगूस घातल्याने संताप व्यक्त होत आहे.

नाशिक : ‘ट्रेकिंग’च्या नावाखाली मद्यप्राशनाची हौस भागविण्यासाठी गड-किल्ल्यांची निवड करणाºयांची वाढती संख्या निसर्गासाठी हानीकारक ठरत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक हरिहर गडावर अशाच एका मद्यपी ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने रानगवताला आग लावत धुडगूस घातल्याने संताप व्यक्त होत आहे.  नाशिक शहरापासून अवघ्या ४० ते ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक अशा अवघड श्रेणीमधील हरिहर गडावर पौर्णिमेच्या प्रकाशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने हैदोस घातला. येथील गवत पेटवून देत मोठ्या आवाजाचे फटाके फोडून निसर्गाची हानी पोहचविण्याचा प्रयत्न केला. गवताला आग लागल्यानंतर गडावरील वृक्षसंपदेसह पशू-पक्ष्यांचे वास्तव्यही धोक्यात आले होते. येथील जैवविविधतेला हानी पोहचविणाºया ‘त्या’ अज्ञात टवाळखोरांविरुद्ध घोटी पोलीस व त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी निरगुडपाडा व हर्षेवाडी भागातील रहिवाशांनी केली आहे. फटाक्यांचा दणदणाट, पेटविलेल्या गवताने वाढलेली आग यामुळे येथील पक्षी-प्राणी सैरभैर झाले होते. हा प्रकार गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर काही आदिवासी बांधवांनी गडावर धाव घेतली.  दरम्यान, मद्य व गांजाच्या नशेत धुंद असलेल्या टोळक्याने गावकºयांसोबत वाद घालत धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केल्याने गावकरी माघारी फिरले. टाके हर्ष गावात या टोळक्याने वाहने उभी करून हरिहर गडावर मुक्काम ठोकला होता.वनविभागाकडून तक्रार त्र्यंबक वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील हरिहर गडावरील लावलेल्या आगीची तीव्रता शनिवारी वनरक्षकांनी पाहणी करून तपासली; मात्र जंगल पेटलेले नव्हते तर शेकोट्यांमुळे काही प्रमाणात गवताची जाळपोळ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वन व वन्यजिवांना धोका पोहचविण्याचा केलेला प्रयत्न आणि गावकºयांशी घातलेला वाद लक्षात घेऊन वनरक्षकाने अज्ञात ट्रेकर्सविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांकडून संबंधित गावकºयांकडून माहिती घेऊन त्यांचा शोध घेतला जाणार आहे. वनविभागाकडूनही वनसंवर्धन कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास आहिरे यांनी सांगितले.‘ट्रेकिंग’च्या नावाखाली अशा प्रकारे गड-किल्ल्यांवर धुडगूस घालणे गैर आहे. यामुळे प्रामाणिक गिर्यारोहक अडचणीत सापडले आहेत. अशा टवाळखोर व मद्यपींवर वनविभागासह पोलिसांनी कारवाई करावी. गिरीभ्रमंती करताना केवळ आपल्या पाऊलखुणांव्यतिरिक्त गड-किल्ल्यांवर कुठलीही वस्तू गिर्यारोहक व दुर्गपर्यटकांनी ठेवणे अपेक्षित नाही. - अंबरिश मोरे, गिर्यारोहक