सातपूर : येथील ट्रायकॉम इंडिया कंपनीतील कामगारांनी पुकारलेल्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी कामगार उपआयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत व्यवस्थापनाच्या वतीने कोणीही उपस्थित न राहिल्याने बैठक बारगळली. शनिवारी (दि.२१) पुन्हा बैठक बोलविण्यात आली आहे. सहायक कामगार आयुक्तकिशोर दहीफळकर यांच्या दालनात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीस सीटू युनियनचे पदाधिकारी तसेच स्थानिक कामगार प्रतिनिधी उपस्थित झाले होते. मात्र व्यवस्थापनाचे कोणीही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. सहायक कामगार आयुक्त दहीफळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. उपस्थित पदाधिकाऱ्यांशी साधकबाधक चर्चा करून शनिवारी पुन्हा बैठक बोलविण्यात आली आहे.
‘ट्रॉयकॉम’प्रकरणी बैठक निष्फळ
By admin | Updated: November 17, 2015 23:25 IST