सटाणा : बागलाण तालुक्यात महसूल यंत्रणा निवडणुक कामकाजात गुंतल्याचा फायदा घेऊन वाळू माफियांनी राजरोज बाळू उपसा सुरु केला आहे. निवडणूक कामात व्यक्त असतांनाही चार दिवसांपूर्वी महसूल यंत्रणेने चोरटी वाळू वाहतूक करतांना पकडलेला ट्रक्टर रात्रीतून पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराबाबत महसूल यंत्रणेने पोलिसांकडे बोट दाखवल्याने पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.बागलाण तालुक्यातील मोसम, गिरणा, आरम, हत्ती, कान्हेरी या नद्यांचे पात्र कोरडे झाल्याने वाळ ूमाफियांनी राजरोज वाळूची चोरी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलची संपूर्ण यंत्रणाच निवडणूक कामकाजात व्यस्त आहे. यामुळे वाळूमाफियांचे अधिकच फावले आहे. असे असतांना या बेसुमार वाळू उपशामुळे पाणी टंचाईच्या झळा अधिक बसू लागल्याने नागरिकांकडून आता वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी जोर धरू लागली आहे.याची दखल घेत गेल्या ५ एप्रिलला तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या वाळू उपशा विरोधी पथकाने रात्रीच्या सुमारास सापळा रचून अजमिर सौंदाणे परिसरातून प्रमोद राजेंद्र पवार यांच्या मालकीचे न्यू हॉलंड कंपनीचे ट्रक्टर चोरटी वाळू वाहतूक करतांना रंगेहाथ पकडून तहसील आवारात जमा करण्यात आले होते.दरम्यान दुसºया दिवशी कोणताही दंड न भरता अंधाराचा फायदा घेऊन ट्रक्टर पसार झाले. हा खळबळजनक प्रकार काल उघडकीस आला आहे. याबाबत तहसीलदार इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थेट पोलीस यंत्रणेकडे बोट दाखवून एकप्रकारे हात वर केले आहे. पोलिसांशी संपर्क साधला असता याबाबत कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे सांगून दोन्ही यंत्रणेने टोलवाटोलवीची भूमिका घेतली आहे.वाळू चोरी रोखण्यासाठी आम्ही विशेष पथक तयार केले असून ते रोज गस्तीवर असते. हे पथक गस्तीवर असतांना ५ एप्रिलला अजमीर सौंदाणे परिसरातून अवैध्य रित्या वाळू वाहतूक करतांना ट्रक्टर पकडले होते. याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली होती. मात्र दुसºया दिवशी अंधाराचा फायदा घेऊन ट्रक्टर पसार झाले. याबाबत चौकशी सुरु असून लवकरच कारवाई करण्यात येईल.- जितेंद्र इंगळे पाटील,तहसीलदार, बागलाण.वाळू चोरीबाबत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नाही. तहसील आवारातून पकडलेला टॅÑक्टर कोणी पळवला असेल तर याबाबत चौकशी करून त्याच्या कठोर कारवाई करण्यात येईल.- वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक, सटाणा.तहसील आवारातून पळवून नेलेला हाच तो वाळूमाफियांचा ट्रक्टर.(फोटो १२ सटाणा वाळू)
चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसील आवारातून पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:24 IST
सटाणा : बागलाण तालुक्यात महसूल यंत्रणा निवडणुक कामकाजात गुंतल्याचा फायदा घेऊन वाळू माफियांनी राजरोज बाळू उपसा सुरु केला आहे. निवडणूक कामात व्यक्त असतांनाही चार दिवसांपूर्वी महसूल यंत्रणेने चोरटी वाळू वाहतूक करतांना पकडलेला ट्रक्टर रात्रीतून पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराबाबत महसूल यंत्रणेने पोलिसांकडे बोट दाखवल्याने पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसील आवारातून पसार
ठळक मुद्देसटाणा : महसूल अन् पोलीस यंत्रणा आली एकमेकावर