शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी युवकाला रिक्षाचालकांसह त्याच्या साथीदारांनी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:28 IST

मुलांना दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. राहत्या घरात तसेच राणेनगर परिसरात पीडितेला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवून बलात्कार केला.

ठळक मुद्देआरडाओरड करू नको, नाही तर जिवे ठार मारू’ असा दम दुधविक्रेत्याकडून महिलेवर बलात्कार

नाशिक : प्रवासी युवकाला रिक्षाचालक व त्याच्या तिघा साथीदारांनी रात्रीच्या सुमारास कलानगर-वडाळागावादरम्यान शंभरफुटी रस्त्यावर शस्त्राचा धाक दाखवून जबर मारहाण करत लुटल्याची घटना गुरुवारी (दि.२) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साईनाथनगर येथून गुरुवारी (दि.२) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी अमोल सुरेश पाटील (२९, रा. चामुंडा क्लासिक) हा युवक रिक्षामध्ये घरी जाण्यासाठी बसला. रिक्षामध्ये रिक्षाचालकासह तिघे इसम पाठीमागे बसलेले होते. यावेळी या तिघांसह रिक्षाचालकाने अमोलच्या पाठीला धारधार शस्त्र लावून आरडाओरड करू नको, नाही तर जिवे ठार मारू’ असा दम भरत रिक्षा कलानगर चौफुलीवरून वडाळागावाच्या दिशेने नाल्यापर्यंत नेली. तेथे त्यास मारहाण करत त्याच्याकडील दहा हजार रुपये किमतीचा स्मार्ट मोबाइल, ९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेत त्याला रिक्षातून ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून संशयित इसमांनी रिक्षातून पळ काढला. याप्रकरणी अमोल याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा संशयित फरार रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बाकले हे करीत आहेत. मागील काही दिवसांपासून इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, परिसरात पोलिसांची गस्त प्रभावी ठरत नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.दुधविक्रेत्याकडून महिलेवर बलात्कारचेतनानगर भागातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेच्या घरात कच्चे दूध देण्याच्या बहाण्याने येत पीडित महिलेचे पतीसोबतच्या खासगी क्षणांचे छायाचित्र व चित्रफिती स्वत:च्या मोबाइलमध्ये घेत वारंवार धमकावून संशयित आरोपी दिलीप जाधव (वय ४०,रा. रायगडनगर) याने पीडितेसोबत १ जून ते ३१ डिसेंबरच्या कालावधीत बळजबरीने संभोग करत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित जाधव हा कच्चे दूध देण्याचा बहाणा करून पीडितेच्या राहत्या घरी आला. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार जाधव याने घरात प्रवेश करत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पीडितेला वारंवार धमकावून तिच्या मुलांना दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. राहत्या घरात तसेच राणेनगर परिसरात पीडितेला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवून बलात्कार के ला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून संशयित जाधवविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास महिला उपनिरीक्षक बरेला करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरी