शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अडकलेले नागरिक गावाकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:33 IST

सिन्नर : गेल्या महिनाभरापासून वावी येथील क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये अडकून पडलेल्या २१ उत्तर भारतीय नागरिकांना रविवारी (दि. १०) संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या मूळगावाकडे रवाना करण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या या प्रवासासाठी प्रशासकीय परवानग्यांचा खेळ आटोपल्यावर हे सर्वजण खासगी वाहनातून मार्गस्थ झाले.

सिन्नर : गेल्या महिनाभरापासून वावी येथील क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये अडकून पडलेल्या २१ उत्तर भारतीय नागरिकांना रविवारी (दि. १०) संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या मूळगावाकडे रवाना करण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या या प्रवासासाठी प्रशासकीय परवानग्यांचा खेळ आटोपल्यावर हे सर्वजण खासगी वाहनातून मार्गस्थ झाले.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या संचारबंदी आदेशाचा भंग करणारे उत्तर प्रदेशातील २१ जण पोलिसात गुन्हे दाखल झाल्यानंतर वावी येथील क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये स्थानबद्ध होते. गेल्या एक महिन्यापासून या नागरिकांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था पंचायत समितीमार्फत सुरू करण्यात आलेल्या क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये करण्यात आली होती. वावी येथील आर.पी. गोडगे पाटील पब्लिक स्कूलच्या वसतिगृहात साकारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये ५२ परप्रांतीय दाखल होते.त्यापैकी मध्यप्रदेशातील नागरिक चार दिवसांपूर्वीच विशेष रेल्वेने रवाना झाले होते. तर उत्तर प्रदेशातील अनुक्रमे १० व ११ जणांचा गट महिन्याभरापासून येथेच अडकून पडला होता. यातील १0 जणांच्या गटाने खासगी वाहनाने जाण्यासाठी स्वतंत्र परवानगी प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, त्या दरम्यान त्यांचे रेल्वेचे पास तयार झाल्याने खासगी वाहनाला परवानगी देण्यात प्रशासन असमर्थ ठरले होते. मात्र, याही परिस्थितीत तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सेंटरचे समन्वयक तालुका पशुधन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी प्रयत्न करत या दहा जणांना उत्तर प्रदेशात जाण्यासाठी विशेष वाहनाची परवानगी मिळवून दिली. ही परवानगी देतानाच सेंटरमध्ये अडकून पडलेल्या अन्य ११ उत्तर भारतीय नागरिकांना देखील त्याच वाहनातून नेण्याची विनंती त्यांनी संबंधितांना केली होती.आपल्यासोबत गेला महिनाभर अडकून पडलेल्या या ११ मजुरांकडे पैसे नसल्याने त्यांना सोबत नेण्यासाठी अलाहाबाद येथील गट तयार झाल्यावर प्रशासनाने यांनादेखील रवाना केले आहे. हे अकरा मजूर अलाहाबाद पासून सुमारे अडीचशे किलोमीटर पुढे जाणार आहेत. अलाहाबाद पर्यंत या मजुरांची वाहनाची सोय झाल्याने प्रशासकीय यंत्रणेने देखील सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :Nashikनाशिक