शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

प्रांत अधिकाऱ्यासह कर्मचारी जाळ्यात

By admin | Updated: February 25, 2015 23:13 IST

लाचलुचपत विभागाचा छापा : सव्वादोन लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

मालेगाव : येथील महसूलच्या नवीन इमारतीत सव्वादोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्यात येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी संदीप पाटील यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी नाना बागडे अलगद अडकले. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी प्रांत कार्यालयात लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अशोक करपे यांच्यासह पथकाने नाना बागडे याला लाच घेताना छापा टाकून पकडले. करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील झोडगे येथील गट नं. ३९४/२ या पाच एकर जमिनीपैकी दोन एकर जमिनीचा बिनशेती परवाना घेण्यासाठी जमीनमालकाने २०१२ मध्ये येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यावेळी त्याच्याकडे पैशाची मागणी झाली; परंतु त्यांनी ती पूर्ण केली नाही म्हणून त्यांचे काम रखडविले गेले. या प्रकरणी जमीनमालकाने सदर अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असता त्यांच्याकडे प्रत्येकवेळी पैशाची मागणी करण्यात आली. त्याला कंटाळून त्याने नाशिकच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. (पान २ वर)त्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाचे पथक मंगळवारी शहरात दाखल झाले होते. त्यांनी पडताळणी केली. यात प्रांत अधिकारी पाटील यांनी दोन लाख रुपये रकमेची मागणी केली असता त्यांना दीड लाख रुपये देण्याचे निश्चित झाले, तसेच संबंधित कामकाज पाहणारे कर्मचारी नाना बागडे यांनी ७५ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. या मागणीनुसार सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी प्रांत कार्यालयात नाना बागडे यांनी टेबलावर प्रांत अधिकाऱ्यांचे दीड लाख व स्वत:चे ७५ हजार असे एकूण सव्वादोन लाख रुपये घेत असताना लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक करपे यांच्यासह हवालदार विलास वाघ, दिलीप ढुमणे आदि कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून त्यांना रंगेहाथ लाच घेताना पकडले. या प्रकरणी येथील छावणी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, लाचलुचपत विभागाचे अपर पोलीस अधीक्षक बी. एस. जाधव आपल्या सहकाऱ्यांसह मालेगावी दाखल झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक असलेल्या सूचना करत घटनास्थळाची पाहणी करून प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली. या झडती सत्रात उपअधीक्षक किशोर मोरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.हा छापा यशस्वी झाल्यानंतर या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याच्या घरांची झडती घेण्यात आली. यासाठी नाशिकच्या अतिरिक्त पथकासह मदत करण्यासाठी धुळे येथील पथकाला शहरात पाचारण करण्यात आले होते. तसेच प्रांत अधिकारी पाटील यांच्या मूळगावी चोपडा येथील घराचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडती घेतली. या झडतीत काय सापडले याची माहिती मिळू शकली नाही. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास लाचलुचपत विभागाचे अधीक्षक प्रवीण पवार यांनी मालेगावी भेट देऊन छावणी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.या छाप्याची बातमी पसरल्यानंतर छावणी पोलीस ठाणे तसेच प्रांत कार्यालयात मोठी गर्दी झाली, तर छाप्यामुळे येथील महसूल विभागात तत्काळ सामसूम झाली. अनेकांनी कार्यालयाकडे फिरकण्याचेही टाळले. काहींनी स्वत:चे भ्रमणध्वनी बंद केले. दिवसभर कर्मचारी दडपणाखाली वावरत होते.