शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

४६०० झाडांना जाळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:39 IST

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात विशेष उपक्रम म्हणून सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ओझर ते शिर्डी विमानतळ जोडणाºया राज्य महामार्गावर वावी ते पंचाळे दरम्यान ५ हजार झाडांची लागवड करण्यात आली होती. पैकी सुमारे ४६०० झाडे जगविण्यात वनविभागाला यश आले असून, या झाडांना संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देवनीकरण विभाग । वावी-पंचाळे रस्त्यावर संरक्षणाचा उपक्रम

सिन्नर : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात विशेष उपक्रम म्हणून सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ओझर ते शिर्डी विमानतळ जोडणाºया राज्य महामार्गावर वावी ते पंचाळे दरम्यान ५ हजार झाडांची लागवड करण्यात आली होती. पैकी सुमारे ४६०० झाडे जगविण्यात वनविभागाला यश आले असून, या झाडांना संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.ओझर आणि शिर्डी विमानतळ जोडणाºया मार्गावर वनविभागाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत सामाजिक वनीकरण विभागाने विविध प्रकारच्या सावली देणाºया व दीर्घायुषी असणाºया वड, पिंंपळ, चिंंच, कडुलिंंब आदी प्रकारांतील सुमारे पाच हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. या लागवड केलेल्या झाडांची गेले वर्षभर वनमजुरांच्या मदतीने निगा राखण्यात येत आहे.या झाडांना पाणी कमी पडू नये म्हणून महिन्याकाठी टँकरने पाणी घालून पुरवठा करण्यात येत आहे. योग्य पद्धतीने काळजी घेतली जात असल्याने या झाडांची जोमदार वाढ झाली आहे.वनमजुरांसमवेत स्थानिक शेतकरी देखील महामार्गाच्या दुतर्फा लागवड केलेल्या या झाडांची काळजी घेत आहेत. वर्षभर काळजी घेतल्यानंतर ५ हजारपैकी ४६०० झाडे जिवंत राहिली. आता वनविभागाकडून या झाडांना संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल सुभाष सांगळे, वनरक्षक दर्शना सौपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे. संरक्षक जाळ्या बसविण्यासोबतच अजून पुढची दोन वर्षे वनविभागच या झाडांचे संवर्धन करणार आहे.गेल्या पावसाळ्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावल्यावर त्यांच्या राखणीचा प्रश्न होता. जनावरांपासून या झाडांना धोका नसला तरी उपद्रवी लोकांकडून मात्र भीती होती. सामाजिक वनीकरण विभागाने रोजंदारी तत्त्वावर मिठसागरे येथील शेतकऱ्यांची मदत घेतली. वनमजूर देखील सोबतीला होते. वनरक्षक सौपुरे यांनी वैयक्तिक लक्ष घालत लागवड केलेल्या झाडांची निगा राखण्यासाठी पुढाकार घेतला. भाऊसाहेब कथले, संदीप कासार, बाबासाहेब कासार, रंगनाथ दिवेकर, हृषिकेश कासार, किरण कासार, संजय जाधव, समाधान कासार, सर्जेराव कासार या शेतकºयांनी या कामात मदत केली.

टॅग्स :environmentपर्यावरण